Press Note

प्रेसनोट
दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अधिनस्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाद्वारे संचलित जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र, माहिम तळ मजला, साई ईश्वटी कॉ. हाउ. सो., मोगल लेन, एमटीएनएल कॉलोनी जवळ, माहीम (पश्चिम), मुंबई – ४०००१६ (माटुंगा वेस्टर्न रेल्वे स्थानका जवळ) दूरध्वनी : ८६५५४३६१३९ येथे ०१ एप्रिल ते ०४ एप्रिल २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं ५.०० वाजेपर्यंत शिबिराचे आयोजित करण्यात आलेले आहे.
शिबिराचा उद्देश:
दिव्यांग व्यक्तींना विविध योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी मदत
– वैश्विक ओळखपत्र (UDID Card)
– निरामय विमा योजना (मतीमंद व्यक्तींसाठी)
– संजय गांधी निराधार योजना
– नॅशनल ट्रस्ट कायदा अंतर्गत पालकत्व दाखला अर्ज
– दिव्यांगांच्या केंद्र, राज्य व महामंडळाच्या विविध योजनांची माहिती
– आवश्यक असे कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, कुबड्या, वॉकर, एल्बो क्रचीस, व्हीलचेअर, चालण्याची काठी इ. सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी व मोजमाप घेण्यात येईल.
– दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती
आवश्यक कागदपत्रांसह सदर शिबिराचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.