विवाहविषयक प्रोत्साहन
विवाहविषयक प्रोत्साहन
निधी
राज्य शासन
योजनेचे उद्दिष्ट
एक दिव्यांग व्यक्ती, किमान ४०% अपंगत्व असलेली, दिव्यांग नसलेल्या व्यक्तीशी विवाह करत असेल, अशी दिव्यांग व्यक्ती विवाहविषयक प्रोत्साहनास पात्र असेल.
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
- विवाह करण्याऱ्या दोघांपैकी किमान एक – पत्नी किंवा पति दिव्यांग असावी
- अर्जदार किमान ४०% दिव्यांग असावा
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
मिळणारे लाभ
पात्र जोडप्याला रु ५००००/- आर्थिक सहाय्य मिळेल.
त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे
- रु २५,०००/- चे बचत प्रमाणपत्र
- रु २०,०००/- रोख रक्कम
- रु ४,५००/- गृहोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात
- रु ५००/- विवाहविषयक प्रोत्साहनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज भरून संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद /सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर यांच्याकडे दाखल करणे. विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दाखल करावा.
योजनेचा प्रकार
सामाजिक प्रोत्साहन
संपर्क कार्यालय
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर
लाभार्थी:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे