प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य
प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य
निधी
राज्य शासन
योजनेचे उद्दिष्ट
स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी, शासकीय संस्थांमध्ये किंवा एखाद्या मान्यताप्राप्त संस्थेमध्ये, व्यावसायिक प्रशिक्षण घेत असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना, उपकरणांच्या खरेदीच्या सुलभीकरणासाठी आर्थिक सहाय्य करणे.
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
- अर्जदाराने शासकीय संस्था किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे.
- अर्जदार किमान ४०% दिव्यांग असावा
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
मिळणारे लाभ
राज्य शासनातर्फे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्ण उपकरणे / संच विकत घेण्यासाठी रु.१०००/- ची आर्थिक मदत केली जाते.
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने विहित नमून्यात अर्ज भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर यांच्याकडे दाखल करणे. विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दाखल करावा. अर्जदाराने त्यांचा प्रस्ताव प्रस्तावित खर्चाच्या अंदाजासहीत सादर करावा.
योजनेचा प्रकार
स्वयंरोजगार
संपर्क कार्यालय
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर
लाभार्थी:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
फायदे:
राज्य शासनातर्फे स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी पूर्ण उपकरणे / संच विकत घेण्यासाठी रु.१०००/- ची आर्थिक मदत केली जाते.
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे