बंद

    दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

    • तारीख : 10/01/2024 -

    दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती

    निधी

    राज्य शासन

    योजनेचे उद्दिष्ट

    दिव्यांग मुलांच्या उच्च शिक्षणास प्रोत्साहन देणे.

    प्रवर्ग

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    पात्रता निकष

    1. इयत्ता दहावी नंतर उच्च माध्यमिक शालांत परीक्षा, पदवी, व्यावसायिक, तांत्रिक, वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शिक्षण घेणे
    2. शिक्षणाच्या मागील वर्षात अनुत्तीर्ण राहिलेले नसावेत
    3. विद्यार्थी किमान ४०% दिव्यांग असला पाहिजे
    4. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
    5. उत्पन्नाची मर्यादा नाही.

    मिळणारे लाभ

    अ. निर्वाह भत्ता
    अनु क्र. गट दरमहा शिष्यवृत्तीचा दर रु. दरमहा शिष्यवृत्तीचा दर रु.
    वसतिगृहस्थ विद्यार्थी अनिवासी विद्यार्थी
    1 गट अ- वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम १२००/- ५५०/-
    2 गट ब- वैद्यकीय, अभियांत्रिकी, कृषी, पशुवैद्यकीय पदविका अभ्यासक्रम ८२०/- ५३०/-
    3 गट क- कला, विज्ञान, वाणिज्य पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षण पदविका ८२०/- ५३०/-
    4 गट ड- पदवी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षापासून ५७०/- ३००/-
    5 गट इ- अकरावी, दहावी आणि पदवी अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष ३८०/- २३०/-

    ब. अंध आणि कमी दृष्टी असण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाठक भत्ता.

    • गट अ, ब, क :
    • दरमहा रु.१००/-

    • गट ड :
    • दरमहा रु.७५/-

    • गट इ :
    • दरमहा रु.५०/-

    क. शिक्षण शुल्क – सक्षम प्राधिकाऱ्याने संमती दिल्याप्रमाणे.

    ड. शैक्षणिक दौऱ्याचा खर्च – दर वर्षी रु.५००/- पर्यन्त.

    इ. प्रकल्प टंकलेखनाचा खर्च – दर वर्षी रु.६००/- पर्यन्त.

    अर्ज करण्याची प्रक्रिया

    अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित संबंधित महाविद्यालयामार्फत अर्ज दाखल करावा.

    योजनेचा प्रकार

    शिक्षण

    संपर्क कार्यालय

    जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई उपनगर व शहर

    लाभार्थी:

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    फायदे:

    दिव्यांग मुलांच्या उच्च शिक्षणास दरमहा शिष्यवृत्ती देणे

    अर्ज कसा करावा

    अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित संबंधित महाविद्यालयामार्फत अर्ज दाखल करावा.