दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती
दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती
निधी
राज्य शासन
योजनेचे उद्दिष्ट
दिव्यांग मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे.
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
- अर्जदार किमान ४०% दिव्यांग असावा
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
- इयत्ता पहिलीपासून ते दहावी पर्यन्त शिकत असले पाहिजे आणि शिक्षणाच्या मागील वर्षात अनुत्तीर्ण राहिलेले नसावा
- उत्पन्नाची मर्यादा नाही
मिळणारे लाभ
- इयत्ता पहिली ते चौथी (कर्णबधीर असणाऱ्यांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी)
- इयत्ता पाचवी ते सातवी
- इयत्ता आठवी ते दहावी
- १८ वर्षे वयापर्यन्तच्या, मानसिक दुर्बलता आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती
- कार्यशाळेतील दिव्यांग प्रशिक्षणार्थी
प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१००/-
प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१५०/-
प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.२००/-
प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१५०/-
प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.३००/-
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित संबंधित शाळेमार्फत अर्ज दाखल करावा.
योजनेचा प्रकार
शिक्षण
संपर्क कार्यालय
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर
लाभार्थी:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे