दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना (डीडीआरएस योजना)
दिव्यांग व्यक्तींना स्वैच्छिक कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजना (डीडीआरएस योजना)
निधी
केंद्र शासनाकडून
पात्रता निकष
खालील श्रेणींमधील संघटना, दीनदयाळ दिव्यांगजन पुनर्वसन योजनेअंतर्गत, आर्थिक सहायतेकरता, अर्ज करण्यासाठी पात्र ठरतील:
- सोसायटी नोंदणी अधिनियम,१८६० (१८६० चा XXI) किंवा इतर संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशाचा अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत संघटना, किंवा
- भारतीय न्यास अधिनियम १८८२ अथवा त्या वेळेला प्रचलित असलेला एखादा समान अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत न्यास किंवा
- कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ खाली किंवा त्या वेळेला प्रचलित असलेला एखादा संबंधित अधिनियमाखाली नोंदणीकृत एखादी ना-नफा संस्था.
दिले जाणारे लाभ
- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या पात्र संस्थांना, सक्षम प्राधिकाऱ्या कडून, त्यांचा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर, या सुधारित योजनेमध्ये नमूद, खर्च-मानकांवर अवलंबीत रकमेच्या ९०% रकमेसाठी पात्र ठरतील. उर्वरित १०% प्रकल्पाची किंमत संबंधित कार्यक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना, स्वतःच्या साधनांतून भरावी लागेल.
- विशेष क्षेत्रांमध्ये स्थित असणाऱ्या प्रकल्पासाठी, सुधारित खर्च-मानकांवर अवलंबीत रकमेच्या १००% रक्कम पात्र ठरेल.
- अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून, अर्ध-वार्षिक लेखापरीक्षित खाती मिळाल्यानंतर, ग्राह्य सहायक अनुदानाची ५०% पर्यन्त (रक्कम) दिली जाईल. उर्वरित सहायक अनुदानाची रक्कम, अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून, पूर्ण आर्थिक वर्षाची लेखापरीक्षित खाती सादर झाल्यानंतर दिली जाईल. किंवा,
- अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून, ९ (नऊ) महिन्यांची लेखापरीक्षित खाती मिळाल्यानंतर, ग्राह्य सहायक अनुदानाची ७५% पर्यन्त (रक्कम) दिली जाईल. उर्वरित सहायक अनुदानाची रक्कम, अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून, पूर्ण आर्थिक वर्षाची लेखापरीक्षित खाती सादर झाल्यानंतर दिली जाईल. किंवा
- अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांकडून , पुढील आर्थिक वर्षाची लेखापरीक्षित खाती, ज्यामध्ये, अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेने केलेला खर्च नमूद असेल, सादर झाल्यानंतर, ग्राह्य सहायक अनुदानाची १००% पर्यन्त रक्कम दिली जाईल.
एका आर्थिक वर्षात, त्याच वर्षातील, अनुदान प्रस्तावासाठीचे सहायक अनुदान, परिपूर्तीच्या आधारावर खालील पद्धतीने दिले जाईल:-
योजनेचा प्रकार
कल्याण योजना
योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
ह्या बद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. पूनर्निर्देशित होण्यासाठी इथे कळ दाबा आणि योजनेसाठी अर्ज करा.
योजनेची मार्गदर्शक तत्त्वे
ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.
लाभार्थी:
सोसायटी नोंदणी अधिनियम,१८६० (१८६० चा XXI) किंवा इतर संबंधित राज्य / केंद्रशासित प्रदेशाचा अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत संघटना, किंवा, भारतीय न्यास अधिनियम १८८२ अथवा त्या वेळेला प्रचलित असलेला एखादा समान अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत न्यास किंवा कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ खाली किंवा त्या वेळेला प्रचलित असलेला एखादा संबंधित अधिनियमाखाली नोंदणीकृत एखादी ना-नफा संस्था.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे