बंद

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती

    • तारीख : 10/01/2024 -

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती

    निधी

    केंद्र शासनाकडून

    पात्रता निकष

    सर्वसाधारण पात्रता निकष –

    • शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
    • शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल
    • समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
    • ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
    • या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
    • (अर्जकर्त्याकडे ) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी,दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
    • योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –

    • शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्ती, सर्व मान्यताप्राप्त शालांत किंवा माध्यमिक परीक्षेनंतरच्या (पदव्युत्तर पदवी पर्यन्त), मान्यताप्राप्त संस्थांच्या अथवा विश्वविद्यालयांच्या अभ्यासक्रमात, शिक्षण घेण्यासाठी दिल्या जातील. त्यांना अपवाद खालीलप्रमाणे :
    • असे उमेदवार, जे एका अभ्यासक्रमाचा एक टप्पा उत्तीर्ण होऊन, दुसऱ्या विषयाचा तोच टप्पा शिकत आहेत उदा.एका विषयात कला स्नातक (पदवी घेऊन), वाणिज्य स्नातक पदवी अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी पात्र ठरणार नाहीत. तथापि, असे विद्यार्थी, जे कला स्नातक / विज्ञान स्नातक / अभियांत्रिकी स्नातक पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन, विधी स्नातक / शिक्षण पदवी (बी एड) / प्राथमिक शिक्षण पदवी (बी.एल.एड) असे अभ्यासक्रम शिकू इच्छितात, ते या योजने अंतर्गत शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) शिष्यवृत्तीस पात्र असतील.
    • जे विद्यार्थी एकाचवेळी दोन वेगळ्या अभ्यासक्रमात शिकत असतील, त्यांना कुठल्यातरी एकाच अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळेल. असे अभ्यासक्रम संबंधित शैक्षणिक प्राधिकरणाच्या नियम आणि अटींमध्ये अनुज्ञेय असायला हवेत.
    • जे विद्यार्थी, कला, विज्ञान, वाणिज्य पूर्व-पदवी परीक्षा, उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होऊन, एखाद्या मान्यताप्राप्त व्यावसायिक अथवा तांत्रिक प्रमाणपत्र/पदविका/पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतील, जर ते अन्यथा पात्र असतील, तर त्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाईल.
    • जे विद्यार्थी, आपला अभ्यासक्रम पत्रव्यवहाराद्वारे चालू ठेवत असतील, या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. पत्रव्यवहार या संज्ञेमध्ये दूरस्थ आणि प्रौढ शिक्षणाचा समावेश आहे.
    • आ) नोकरीदार विद्यार्थी, ज्यांचे उत्पन्न, त्यांच्या पालक / पालनकरत्याच्या उत्पन्नासहीत एकत्रित केले असता, विहित मर्यादेच्या आत असेल, अशा विद्यार्थ्यांना शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती दिली जाऊ शकेल. ही शिष्यवृत्ती, अनिवार्यपणे देय आणि विना परतावा शिक्षणशुल्काच्या मर्यादेपर्यंतच परिपूर्त केली जाईल.
    • पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाखांपेक्षा अधिक नसावे.

    दिले जाणारे लाभ

    शालांत परीक्षेनंतर मिळणारी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीमध्ये, अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी खालील लाभांचा समावेश आहे:

    1. देखभाल भत्ता
    2. पुस्तकांसाठी अनुदान
    3. अपंगत्व भत्ता
    4. अनिवार्यपणे देय आणि विना परतावा शिक्षणशुल्काची प्रतिपूर्ती
    अनु क्र तपशील अनिवासी विद्यार्थी वसतिगृहस्थ विद्यार्थी
    1 देखभाल भत्ता (दर महा)
    i गट I
    सर्व वैद्यकीय / अभियांत्रिकी / तंत्रज्ञान, नियोजन /वास्तुशास्त्र / फॅशन तंत्रज्ञान / व्यवस्थापन / उद्योगधंदा / वित्त प्रशासन / संगणक विज्ञान आणि अनुप्रयोग / कृषी / पशुवैद्यकीय आणि संबंधित विज्ञान ह्या विषयातले स्नातक / पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम. कुठल्याही ज्ञानशाखेतील, (यूजीसी) विद्यापीठ अनुदान आयोग किंवा (एआयसीटीई) अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेकडून मान्यताप्राप्त, सर्व पदव्युत्तर पदवी आणि पदविका अभ्यासक्रम.
    ७५० १६००
    ii गट II
    औषधनिर्माणशास्त्र (बी.फार्मा), विधी स्नातक, न्यायसहायक विज्ञान स्नातक (फॉरेन्सिक सायन्स बॅचलर), पुनर्वसन, रोगनिदानकौशल्य इ. इतर निमवैद्यकीय सेवा,जनसंसूचन, हॉटेल व्यवस्थापन व खानपान, प्रवास/पर्यटन/आतिथ्य, गृहशोभन, पोषण आणि आहारशास्त्र, व्यावसायिककला, वित्तीय सेवा (बँकेचे व्यवहार / विमा / कर आकारणी) अशासारख्या क्षेत्रामधील व्यावसायिक पदवी / पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम
    ७०० ११००
    iii गट IIIगट I आणि II मध्ये समाविष्ट नसलेले सर्व इतर स्नातक पदवी अभ्यासक्रम उदा. बीए / बीएससी / बीकॉम ई. ६५० ९५०
    iv गट ivशालांत परीक्षेनंतरच्या मॅट्रिकोत्तर स्तरावरील सर्व पदवी न देणारे अभ्यासक्रम, ज्यांच्यासाठी प्रवेश पात्रता माध्यमिक शाळा (इयत्ता दहावी), ठरवण्यात आली आहे. उदा. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता अकरावी आणि बारावी), सामान्य आणि व्यावसायिक शाखा, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे अभ्यासक्रम, तंत्रविद्यानिकेतनाचा ३ वर्षांचा पदविका अभ्यासक्रम इ. ५५० ९००
    2 अपंगत्व भत्ता (प्रति वर्षी)
    i दृष्टिदोष किंवा बौद्धिक अपंगत्व ४०००
    ii उर्वरित सर्व अपंगत्वाचे प्रकार २०००
    3 अनिवार्यपणे देय आणि विना परतावा शिक्षणशुल्काची प्रतिपूर्ती – प्रति वर्षी शिक्षण शुल्क भत्ता (कमाल मर्यादा ) शिक्षण शुल्क भत्ता: रु. १,५०,०००/- प्रति वर्षी
    4 पुस्तकांसाठी अनुदान (प्रति वर्षी) पुस्तकांसाठी अनुदान: रु. १,५०० /- प्रति वर्षी

    योजनेचा प्रकार

    शिष्यवृत्ती

    योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

    ह्या बद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. पूनर्निर्देशित होण्यासाठी इथे कळ दाबा आणि योजनेसाठी अर्ज करा.

    योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

    ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.

    लाभार्थी:

    अकरावी, बारावी, शालांत परीक्षेनंतर मिळणारी (मॅट्रिकोत्तर) पदविका / प्रमाणपत्र अभ्यासक्रम, भारतातील स्नातक पदवी किंवा पदविका, विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) किंवा अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेकडून (एआयसीटीई) मान्यताप्राप्त विश्वविद्यालयाची पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमात शिकणारे दिव्यांग विद्यार्थी

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे