दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती
प्रशिक्षित दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य
निधी
केंद्र शासनाकडून
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
सर्वसाधारण पात्रता निकष –
- शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
- शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
- समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
- ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
- (अर्जकर्त्याकडे ) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी,दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
- उमेदवार, शासकीय शाळा किंवा शासन-मान्यता प्राप्त किंवा केंद्र/राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मान्यताप्राप्त शाळेत, नववी किंवा दहावीत शिकणारा, एक नियमित, पूर्ण वेळ देणारा विद्यार्थी असावा.
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. २.५ लाखांपेक्षा अधिक नसावे.
योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –
दिले जाणारे लाभ
शालांत परीक्षापूर्व शिष्यवृत्तीमध्ये, अभ्यासक्रमाच्या पूर्ण कालावधीसाठी खालील लाभांचा समावेश आहे:
- देखभाल भत्ता
- पुस्तकांसाठी अनुदान
- अपंगत्व भत्ता
अनु क्र | तपशील | अनिवासी विद्यार्थी | वसतिगृहस्थ विद्यार्थी |
---|---|---|---|
1 | देखभाल भत्ता (दर महा) | ५०० | ८०० |
2 | पुस्तकांसाठी अनुदान (प्रति वर्षी) | १००० | १००० |
अपंगत्व भत्ता (प्रति वर्षी) | |||
3 | दृष्टिदोष किंवा बौद्धिक अपंगत्व | ४००० | ४००० |
4 | उर्वरित सर्व अपंगत्वाचे प्रकार | २००० | २००० |
योजनेचा प्रकार
शिष्यवृत्ती
योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
ह्या बद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. पूनर्निर्देशित होण्यासाठी इथे कळ दाबा आणि योजनेसाठी अर्ज करा.
योजनेची मार्गदर्शक तत्त्वे
ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.
लाभार्थी:
इयत्ता नववी आणि दहावीत शिकणारे दिव्यांग विद्यार्थी
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे