बंद

    दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना

    • तारीख : 09/01/2024 -

    दिव्यांगांसाठी राज्य पुरस्कार योजना

    निधी

    राज्य शासन

    योजनेचे उद्दिष्ट

    दर वर्षी राज्य शासनाकडून, सर्वोत्कृष्ठ दिव्यांग कर्मचारी / नियोक्ता / रोजगार सेवा संस्था यांना त्यांनी विविध क्षेत्रात दिव्यांगांनी केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल गौरवान्वित करण्यासाठी त्यांना पुरस्कार देणे.

    प्रवर्ग

    सर्व दिव्यांग प्रवर्ग यांना पुरस्कार देण्यात येतो.

    पात्रता निकष

    1. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
    2. अर्जदार किमान ४०% दिव्यांग असला पाहिजे
    3. अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरून, तो अर्ज संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर ह्यांच्याकडे सादर करणे.

    मिळणारे लाभ

    1. सर्वोत्कृष्ठ कर्मचारी (सर्व प्रवर्ग)
    2. पुरस्कारांची संख्या :- 12
      पुरस्काराचे स्वरूप :- रु.१०,०००/- रोख, आदेशन पत्र आणि प्रमाणपत्र

    3. सर्वोत्कृष्ठ नियोक्ता (शासकीय / सार्वजनिक / खासगी क्षेत्र )
    4. पुरस्कारांची संख्या :- 2
      पुरस्काराचे स्वरूप :- रु. २५,०००/- रोख, स्मृतिचिन्ह, आदेशन पत्र आणि प्रमाणपत्र

    अर्ज करण्याची प्रक्रिया

    विहित नमुन्यामध्ये अर्ज दाखल करावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, परिचयपत्र, अपंगत्व क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची कागदपत्रे जोडावीत.

    योजनेचा प्रकार

    सामाजिक प्रोत्साहन

    संपर्क कार्यालय

    जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर

    लाभार्थी:

    सर्व दिव्यांग प्रवर्ग यांना पुरस्कार देण्यात येतो.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे