बंद

    विवाहविषयक प्रोत्साहन

    • तारीख : 10/01/2024 -

    विवाहविषयक प्रोत्साहन

    निधी

    राज्य शासन

    योजनेचे उद्दिष्ट

    एक दिव्यांग व्यक्ती, किमान ४०% अपंगत्व असलेली, दिव्यांग नसलेल्या व्यक्तीशी विवाह करत असेल, अशी दिव्यांग व्यक्ती विवाहविषयक प्रोत्साहनास पात्र असेल.

    प्रवर्ग

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    पात्रता निकष

    1. विवाह करण्याऱ्या दोघांपैकी किमान एक – पत्नी किंवा पति दिव्यांग असावी
    2. अर्जदार किमान ४०% दिव्यांग असावा
    3. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा

    मिळणारे लाभ

    पात्र जोडप्याला रु ५००००/- आर्थिक सहाय्य मिळेल.
    त्याचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे

    1. रु २५,०००/- चे बचत प्रमाणपत्र
    2. रु २०,०००/- रोख रक्कम
    3. रु ४,५००/- गृहोपयोगी वस्तूंच्या स्वरूपात
    4. रु ५००/- विवाहविषयक प्रोत्साहनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी

    अर्ज करण्याची प्रक्रिया

    अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज भरून संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद /सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर यांच्याकडे दाखल करणे. विहित नमुन्यामध्ये आवश्यक कागदपत्रासहित अर्ज दाखल करावा.

    योजनेचा प्रकार

    सामाजिक प्रोत्साहन

    संपर्क कार्यालय

    जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद / सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर

    लाभार्थी:

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे