प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती
प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्ती
निधी
केंद्र शासनाकडून
पात्रता निकष
सर्वसाधारण पात्रता निकष –
- शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
- शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
- समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
- ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
- या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
- (अर्जकर्त्याकडे) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
- (या शिष्यवृत्तीसाठी) दिव्यांगजन सशक्तिकरण विभागातर्फे अधिसूचित, शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ठ संस्थांमधील स्नातक आणि पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रम ग्राह्य धरले जातील.
- या योजनेअंतर्गत, कुठल्याही शाखेचे दूरस्थ शिक्षण / अर्ध-वेळ / सप्ताहान्त शिक्षण, शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही. याशिवाय, एका व्यक्तीस एकदाच ही सुविधा मिळत असल्यामुळे, या घटकांतर्गत दिला जाणारा लाभ, दुसऱ्या अथवा नंतरच्या लाभासाठी विचारात घेतला जाणार नाही
- पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा अधिक नसावे.
योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –
दिले जाणारे लाभ
प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीच्या प्रमाणामध्ये खालील घटकांचा समावेश आहे:-
अनु क्र | शिष्यवृत्तीचे घटक / तपशील | योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य |
---|---|---|
1 | संस्थेला दिलेले / देय शिक्षणशुल्क आणि विना परतावा शुल्काची प्रतिपूर्ती | प्रति वर्षी रु. दोन लाखापर्यंत (वास्तविक रकमेवर अवलंबून) |
2 | देखभाल भत्ता | रु. ३,०००/- दर महा वसतिगृहस्थ विद्यार्थ्यांसाठी, रु. १,५००/- दर महा अनिवासी विद्यार्थ्यांसाठी |
3 | विशेष भत्ता (अपंगत्वाच्या प्रकारांशी संबंधित, जसे की पाठक भत्ता, अनुरक्षक, मदतनीस भत्ता इ.) | रु. २,०००/- दर महा |
4 | पुस्तके आणि लेखनसामग्री | रु. ५,०००/- प्रति वर्षी |
5 | संगणक / मांडी संगणक आणि त्यांना लागणारी उपसाधने खरेदी करण्यास लागणाऱ्या खर्चाची परिपूर्ती | अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये एकदाच मिळणारे अनुदान म्हणून रु. ४५,०००/-. (या घटकाचा लाभ घेण्यासाठी, विद्यार्थ्याला, आवश्यक कागदपत्रे दाखल करावी लागतील उदा. संगणक / मांडी संगणक खरेदी केल्याचा पुरावा म्हणून देयक / पावती) |
6 | निवडलेल्या उमेदवारांच्या, विशिष्ठ अपंगत्वाशी संबंधित, साधने आणि सहायक उपकरणे खरेदी करण्यासाठी केलेल्या खर्चाची परिपूर्ती. | अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षामध्ये एकदाच मिळणारे अनुदान म्हणून रु. ३०,०००/-. (रकमेची परिपूर्ती मिळण्यासाठी, विद्यार्थ्याला, आवश्यक कागदपत्रे दाखल करून, दाव्याची सत्यता सुनिश्चित करावी लागेल, जसे की, खरेदी देयक / पावती. |
योजनेचा प्रकार
शिष्यवृत्ती
योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया
ह्या बद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल.पूनर्निर्देशित होण्यासाठी इथे कळ दाबा आणि योजनेसाठी अर्ज करा.
योजनेची मार्गदर्शक तत्त्वे
ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.
लाभार्थी:
(या शिष्यवृत्तीसाठी) दिव्यांगजन सशक्तिकरण विभागातर्फे अधिसूचित, शिक्षणक्षेत्रातील उत्कृष्ठ संस्थांमधील स्नातक आणि पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रम ग्राह्य धरले जातील.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे