बंद

    दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पाठ्यवृत्ती

    • तारीख : 11/01/2024 -

    दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पाठ्यवृत्ती

    निधी

    केंद्र शासनाकडून

    या योजनेमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

    • विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडून मान्यताप्राप्त सर्व विश्वविद्यालये / संस्था / महाविद्यालये
    • विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम १९५६ च्या कलम २(फ) मध्ये अधिसूचित केलेली आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदे (एनएएसी) द्वारे वैध मान्यता असणारी सर्व केंद्र / राज्य विश्वविद्यालये (घटक आणि संलग्न संस्था समाविष्ट). /li>
    • विश्वविद्यालय अनुदान आयोग अधिनियम १९५६ च्या कलम ३ अंतर्गत, अभिमत विश्वविद्यालय म्हणजे केंद्र शासनाने, विश्वविद्यालय अनुदान आयोगाशी विचारविनिमय करून, अभिमत विश्वविद्यालय म्हणून नमूद केलेली आणि आणि राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषदे (एनएएसी) द्वारे वैध मान्यता असणारी उच्च शिक्षण संस्था.
    • राज्य / केंद्र शासनाद्वारे पूर्णपणे अनुदानित आणि पदवी प्रदान करण्यासाठी सक्षम अशी संस्था.
    • शिक्षण मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या राष्ट्रीय महत्व असणाऱ्या संस्था.

    पात्रता निकष

    सर्वसाधारण पात्रता निकष –

    • शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
    • शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
    • समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
    • ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
    • या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
    • (अर्जकर्त्याकडे) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
    • योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –

    • पाठ्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
    • या योजनेमधील पाठ्यवृत्ती धारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
    • पाठ्यवृत्ती, अशा उमेदवारांना दिल्या जातील, जे, योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये संदर्भित विश्वविद्यालय/संशोधन संस्थांमध्ये, नियमित आणि पूर्णवेळ, तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल)/विद्यावाचस्पती, अशा उच्च अभ्यासक्रमात शिक्षण घेत असतील.
    • एक अभ्यासक, एका वेळेस, एकच पाठ्यवृत्ती मिळण्यास पात्र ठरेल. अशा अभ्यासकास, तो/ती, इतर स्त्रोतांकडून, आणखी कुठलेही आर्थिक सहाय्य / शिष्यवृत्ती / पाठ्यवृत्ती स्वीकारणार अथवा घेणार नाहीत, असे जाहीर करावे लागेल. म्हणजेच, शिष्यवृत्तीच्या कार्यकाळात, या योजनेअंतर्गत पाठ्यवृत्ती मिळालेल्या अभ्यासकाला, इतर स्त्रोतांकडून, दुसरी पाठ्यवृत्ती / शिष्यवृत्ती किंवा एखादी नियुक्ती, सशुल्क अथवा अन्यथा, कुठलेही मानधन, वेतन, विद्यावेतन इ. स्वीकारत येणार नाही. एक वर्षाची ‘शैक्षणिक रजा’ ह्याला अपवाद असेल. जर एखाद्या अभ्यासकाला आधीच एक शिष्यवृत्ती / पाठ्यवृत्ती मिळालेली असेल, तर त्याला / तिला, अश्या आधीच्या शिष्यवृत्ती / पाठ्यवृत्ती / इतर आर्थिक सहाय्याचा त्याग करावा लागेल अथवा या योजनेअंतर्गत झालेली निवड सोडून द्यावी लागेल.
    • जो अभ्यासक, त्याच्या / तिच्या पाठ्यवृत्ती च्या कार्यकाळातले संशोधनाचे काम पूर्ण करणार नाही, तो/ती या योजनेअंतर्गत पुनः अर्ज करण्यास अपात्र ठरेल. त्याचप्रमाणे, ज्या अभ्यासकाने, अशी पाठ्यवृत्ती , पूर्णपणे अथवा अंशतः, विद्यावाचस्पती अभ्यासक्रमासाठी वापरली असेल, तो अभ्यासक, या योजनेअंतर्गत पुनः अर्ज करण्यास अपात्र ठरेल.
    • विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे, वेळोवेळी, निर्गमित केलेल्या पाठ्यवृत्ती मार्गदर्शक तत्वानुसार, कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती च्या स्वरूपात पाठ्यवृत्ती मध्ये सामील होण्याच्या दोन वर्षात, पाठ्यवृत्ती धारकाच्या संशोधन कामात समाधानकारक प्रगती असेल तर त्याचा / तिचा कार्यकाल, वरिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती च्या स्वरूपात, आणखी तीन वर्षांसाठी वाढवला जाईल.
    • उमेदवार ज्या वर्षासाठी पाठ्यवृत्ती साठी निवडला गेला असेल, त्या वर्षाच्या १ एप्रिलपासून किंवा तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल)/विद्यावाचस्पती अभ्यासक्रमाची नोंदणीची/रुजू होण्याची तारीख, यापैकी जी नंतर असेल, त्या तारखेपासून, पाठ्यवृत्ती ची रक्कम अदा केली जाईल.
    • एकत्रित तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल) आणि विद्यावाचस्पती अभ्यासक्रम किंवा विद्यावाचस्पती अभ्यासक्रमाचा कमाल कार्यकाल पाच वर्षांचा असेल. तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल) अभ्यासक्रमासाठी दोन वर्षे अथवा तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवीचा (एम.फिल) प्रबंध सादर करण्याची तारीख, यापैकी जी आधी असेल, त्या तारखेपासून, पाठ्यवृत्ती दिली जाईल.
    • तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल) पासून विद्यावाचस्पती अभ्यासक्रम चालू करण्यामध्ये विरामाचा कालावधी दोन वर्षे आहे. (तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल) अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर होण्याची तारीख ते विद्यावाचस्पती अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची तारीख). तथापि, पाठ्यवृत्ती चा कार्यकाल, विरामाचा कालावधी वगळता, पाच वर्षेच असेल. विरामाचा कालावधीमध्ये पाठ्यवृत्ती ची रक्कम दिली जाणार नाही.
    • पाठ्यवृत्ती , विद्यावाचस्पती प्रबंध सादर करायच्या तारखेपर्यंत किंवा पाच वर्षांच्या कालावधी, यापैकी जी घटना आधी घडेल, तेवढ्या कालावधीसाठी दिली जाईल. पाठ्यवृत्ती च्या पाच वर्षांच्या कालावधीपेक्षा जास्त अवधि वाढवून मिळणार नाही.
    • कुठल्याही विश्वविद्यालय / महाविद्यालय / शैक्षणिक संस्था / केंद्र, राज्य, केंद्रशासित प्रदेश शासनाच्या कर्मचाऱ्यांना, पाठ्यवृत्ती योजनेतून वगळण्यात आले आहे. जरी त्यांनी, तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल)/विद्यावाचस्पती अभ्यासक्रमात शिकण्यासाठी, अध्ययन रजा किंवा असाधारण रजा घेतली असेल तरी ते अपात्रच असतील.
    • एका व्यक्तीस आयुष्यात एकदाच पाठ्यवृत्ती मिळत अस्लयमुळे, कुठलाही अधिछात्र दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर पाठ्यवृत्ती साठी विचारात घेतला जाणार नाही.

    दिले जाणारे लाभ

    पाठ्यवृत्ती चे दर, विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या पाठ्यवृत्ती च्या दरांशी, सममूल्य असतील. सध्या हे दर खालीलप्रमाणे आहेत:-

    अनु क्र पाठ्यवृत्ती चे तपशील/घटक योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य
    1 पाठ्यवृत्ती (सर्व विषयांसाठी) @ रु.३१,०००/- दर महा, कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती च्या स्वरूपात, दोन वर्षांसाठी.
    @ रु. ३५,०००/- दर महा, वरिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती च्या स्वरूपात, त्यानंतरच्या कमाल तीन वर्षांच्या कालावधीसाठी.
    2 आकस्मिकता (मानवता, सामाजिक विज्ञान आणि वाणिज्य शाखांसाठी), (कला / ललित कलांसहित) @ रु. १०,०००/- प्रति वर्षी, पहिल्या दोन वर्षांसाठी
    @ रु. २०,५००/- प्रति वर्षी, उर्वरित कार्यकालासाठी
    3 आकस्मिकता, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानासाठी @ रु. १२,०००/- प्रति वर्षी, पहिल्या दोन वर्षांसाठी
    @ रु. २५,०००/- प्रति वर्षी, उर्वरित कार्यकालासाठी.
    4 पाठक ,अनुरक्षक सहाय्यता (विश्वविद्यालय / संस्थेच्या अधीक्षण अधिकाऱ्याच्या पडताळणीनुसार) @ रु. २,०००/- दर महा.
    5 घर भाडे भत्ता (एचआरए) भारत सरकार तर्फे निर्गमित केलेल्या नियमानुसार, काम करून (अर्थअर्जन करणाऱ्या) संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्यांना वसतिगृहात निवास दिला जाणार नाही, त्यांना ,@ ९%, १८% and २७% दराने घर भाडे भत्ता दिल जाईल.

    टिपण –

    (i)घर भाडे भत्यासंबंधात –

    • जर, अभ्यासकास त्याच्या / तिच्या संस्थेद्वारे , वसतिगृहात निवास दिला गेला असेल, तर अभ्यासकास फक्त वसतिगृह शुल्क मिळेल, खानपान, वीज, पाणी इ. शुल्क मिळणार नाहीत.
    • जर, विश्वविद्यालय / संस्थेद्वारे दिलेला वसतिगृहातील निवास, उमेदवाराने नाकारला, तर तो / ती घर भाडे भत्ता मिळण्यासाठी अपात्र ठरतील.
    • जर, वसतिगृहात निवास उपलब्ध नसेल, तर यजमान संस्थेद्वारे एकल निवास पुरवला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, अभ्यासकाने भाडे म्हणून दिलेल्या प्रत्यक्ष रकमेची परिपूर्ती केली जाईल. ही परिपूर्ती, भारत सरकारच्या, घर भाडे भत्ता नियमाप्रमाणे, कमाल मर्यादेपर्यंत सीमित असेल.
    • जर, एखादा अभ्यासक त्याची / तिची राहण्याची सोय स्वतःच करणार असेल, तर तो / ती, घर भाडे भत्ता मिळण्यास पात्र ठरेल. हा घर भाडे भत्ता, भारत सरकारच्या नियमाप्रमाणे, कमाल मर्यादा आणि गावांच्या वर्गीकरणावर अवलंबून असेल.
    • जर, अभ्यासकाला घर भाडे भत्ता हवा असेल, तर त्याला/तिला, दर महिन्याला, विहित नमुन्यातले मासिक पुष्टीकरण प्रमाणपत्र, त्याच्या/तिच्या संस्थेकडे सादर करून, तो मागावा लागेल.

    (ii) इतर सुविधा, जशा की, वैद्यकीय सुविधा, प्रसूती रजेसह रजा, विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या पाठ्यवृत्ती अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार शासित केल्या जातील.

    योजनेचा प्रकार

    पाठ्यवृत्ती

    योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

    • विद्यार्थ्यांना, पाठ्यवृत्ती प्रदान करण्याची निवड, त्यांनी, राष्ट्रीय परीक्षण संस्थेद्वारे आयोजित, विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी- नेट) आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परीक्षांमध्ये (यूजीसी- सीएसआयआर) मिळवलेल्या गुणांवर केली जाईल. राष्ट्रीय परीक्षण संस्थेद्वारे, पात्र उमेदवारांची अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाईल. ही यादी, अशा उमेदवारांमधून तयार केली जाईल, जे ‘प्रमाणरुप अपंगत्वाचे निकष’ पुरे करत असतील आणि ज्यांनी दोन्ही, कनिष्ठ संशोधन पाठ्यवृत्ती आणि राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी अर्ज केले आहेत पण फक्त राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी पात्र ठरत आहेत.
    • ज्या पात्र उमेदवारांना, अजून अभ्यासक्रमात प्रवेश मिळालेला नाही, परंतु या योजनेअंतर्गत, दिव्यांग व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पाठ्यवृत्ती साठी अर्ज भरलेला आहे, त्यांना, पहिली उपलब्ध संधी गाठून, मान्यताप्राप्त संशोधन संस्थेत, नियमित आणि पूर्ण वेळ तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल)/विद्यावाचस्पती अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा लागेल. असा प्रवेश, पाठ्यवृत्ती प्रदान होण्याच्या तीन वर्षांच्या आत घ्यावा लागेल.
    • या योजनेअंतर्गत, पाठ्यवृत्ती प्रदान करण्याच्या आधी, उमेदवाराने सादर केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्राची सत्यता, संबंधित विश्वविद्यालय / संस्थेकडून पडताळून बघितली जाईल. दिव्यांग पाठ्यवृत्ती धारकांनी सादर केलेली कागदपत्रे, विश्वविद्यालय / संस्थेच्या अधीक्षण अधिकाऱ्याच्या पडताळणीनंतर, अंतिम मंजुरीसाठी विभागाकडे पाठवण्यात येईल.
    • पाठ्यवृत्ती प्रदान करण्याबाबतीचे, विभागाचे निर्णय अंतिम असतील आणि अशा निर्णयाबद्दल कोणतीही याचिका विचारात घेतली जाणार नाही.
    • परिणाम विभागाच्या संकेत स्थळावर प्रकाशित केले जातील आणि निवड झालेल्या उमेदवारांना प्रदान पत्रे दिली जातील.

    योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

    ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.

    लाभार्थी:

    या योजनेचा उद्देश, दिव्यांग व्यक्तींना, आर्थिक सहाय्यतेचा स्वरूपात, पाठ्यवृत्ती प्रदान करणे असा आहे. ज्यायोगे, त्यांना, विश्वविद्यालय अनुदान आयोगाकडून मान्यताप्राप्त भारतीय विश्वविद्यालये / संस्था / महाविद्यालयात, विज्ञान, मानवविज्ञान किंवा सामाजिक शास्त्र इ. विषयांमध्ये विद्यावाचस्पती, तत्वज्ञानात पदव्युत्तर पदवी (एम.फिल) अशा उच्च अभ्यासक्रमात शिक्षण घेता येईल.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे