बंद

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती

    • तारीख : 10/01/2024 -

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती

    निधी

    केंद्र शासनाकडून

    पात्रता निकष

    सर्वसाधारण पात्रता निकष –

    • शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
    • शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
    • समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
    • ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
    • या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
    • (अर्जकर्त्याकडे) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.
    • योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –

    • ही शिष्यवृत्ती अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
    • विद्यावाचस्पती पदवीकरिता – संबंधित पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये पंचावन्न टक्के (५५%) गुण किंवा सममूल्य गुणवत्ता.
    • पदव्युत्तर पदवीकरिता : – संबंधित स्नातक पदवी परीक्षेमध्ये पंचावन्न टक्के (५५%) गुण किंवा सममूल्य गुणवत्ता.
    • जर सत्र गुणवत्ता अंक किंवा सरासरी गुणवत्ता अंक निर्देशांक इ. जर सममूल्य असतील, तर संस्था/महाविद्यालय/विश्वविद्यालय यांच्याकडून रितसर प्रमाणित रूपांतर गुणक मान्य केले जाईल.
    • असे उमेदवार, जे, कुठल्याही एखाद्या केंद्र/राज्य शासनाच्या मंत्रालय/विभागाकडून उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीचा उपयोग करून / इतर माध्यमातून / स्वतःच्या खर्चाने, परदेशी संस्था / महाविद्यालय / विश्वविद्यालयात आधीपासून पदव्युत्तर पदवी किंवा विद्यावाचस्पती पदवी अभ्यासक्रमात शिकत आहेत अथवा ज्यांनी पदव्युत्तर/ विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे, या योजनसाठी अर्ज करण्यास अपात्र असतील. याशिवाय, राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती, एक व्यक्तीला त्याच्या/तिच्या आयुष्यात एकदाच मिळू शकते.
    • जे उमेदवार, समान पातळीवरील (पदव्युत्तर/ विद्यावाचस्पती पदवी) परंतु वेगळ्या शाखेच्या (विज्ञान/वाणिज्य/कला) अभ्यासक्रमात शिकू इच्छितात, ते सुद्धा या योजनेखालील शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. त्याकरिता, त्यांनी एखाद्या, भारतीय अथवा परदेशी विश्वविद्यालय / संस्था / महाविद्यालयाची पात्रता संपादन केलेली असली पाहिजे. उमेदवाराने, त्या समान पातळीवरील अभ्यासक्रमासाठी, केंद्र/राज्य शासनातर्फे दिली जाणारी शिष्यवृत्तीचा अवलंब केलेला नसावा.
    • (अर्जदाराचे वय) अर्ज केल्याच्या वर्षाच्या १ जानेवारीला ३५ (पस्तीस) वर्षाखाली असावे.
    • पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा अधिक नसावे.

    दिले जाणारे लाभ

    आर्थिक सहाय्याचे प्रमाण खालीलप्रमाणे असेल –

    अनु क्र लाभांचे प्रकार आणि तपशील दर उद्देश
    1 शिक्षणशुल्क प्रत्यक्ष रक्कम
    देखभाल भत्ता
    2 अमेरिका आणि इतर देश अमेरिकन डॉलर १५,४०० प्रति वर्षी (अ) आणि (ब) देशांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, भोजन आणि आवासाकरीता होणाऱ्या संकीर्ण खर्चासाठी देखभाल भत्ता दिला जाईल
    3 इंग्लंड साठी ब्रिटिश पौंड ९९०० प्रति वर्षी (अ) आणि (ब) देशांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना, भोजन आणि आवासाकरीता होणाऱ्या संकीर्ण खर्चासाठी देखभाल भत्ता दिला जाईल.
    आकस्मितता भत्ता
    4 अमेरिका आणि इतर देश अमेरिकन डॉलर १५०० प्रति वर्षी पुस्तके, उपयुक्त उपकरणे, अभ्यासदौरा, अभ्यासक्रमासंबंधीत परिषदा/कार्यशाळांना उपस्थित राहण्यासाठी होणारा खर्च इ./प्रबंधाचे टंकलेखन आणि पुस्तकबांधणी इ. साठी उपलब्ध.
    5 इंग्लंड साठी ब्रिटिश पौंड ११०० प्रति वर्षी पुस्तके, उपयुक्त उपकरणे, अभ्यासदौरा, अभ्यासक्रमासंबंधीत परिषदा/कार्यशाळांना उपस्थित राहण्यासाठी होणारा खर्च इ./प्रबंधाचे टंकलेखन आणि पुस्तकबांधणी इ. साठी उपलब्ध.
    6 आकस्मिक प्रवास भत्ता $ २०/- (अमेरिकन डॉलर वीस फक्त) किंवा भारतीय रुपयामध्ये त्याच्या समतुल्य – फक्त एकदा
    7 उपकरण भत्ता $ २०/- (अमेरिकन डॉलर वीस फक्त) – फक्त एकदा
    8 डोईपट्टी (पोल टॅक्स) प्रत्यक्ष रक्कम दिली जाईल, जिथे लागू असेल तिथे
    9 प्रवासासाठी आवश्यक वैद्यकीय चाचण्यांसाठी होणारा खर्च. यजमान देशाच्या आवशक्यतेनुसार देयक सदर केल्यावर प्रत्यक्ष रक्कम दिली जाईल.
    10 बँक व्यवहार शुल्क रूपांतर शुल्क + सेवा शुल्क + स्त्रोतवरील कर (टीसीएस)+ रूपांतर अडत, देयक सदर केल्यावर प्रत्यक्ष रक्कम दिली जाईल.
    11 प्रवेश परवाना शुल्क (व्हिसा शुल्क) प्रवेश परवाना शुल्काची प्रत्यक्ष रक्कम भारतीय रुपयात दिली जाईल.
    12 वैद्यकीय विम्याचा हप्ता प्रत्यक्ष रक्कम
    13 विमान प्रवास खर्च a) शिष्यवृत्ती धारकांना विमानाचे तिकीट (भारतातील राहत्या गावाच्या सगळ्यात जवळच्या विमानतळापासून ते शैक्षणिक संस्थेच्या सर्वात जवळच्या गावापर्यंत आणि भारतात परत येण्यासाठी) खरेदी करण्याची परवानगी असेल. हे तिकीट तीन अधिकृत प्रवास सहायकांकडूनच म्हणजे बामर लॉंरी कंपनी लि., अशोक ट्रॅवल्स & टुर्स, भारतीय रेल खानपान आणि पर्यटन महामंडळ (आयआरसीटीसी) खरेदी केलेले असले पाहिजे. हे तिकीट आरक्षण करण्याच्या दिवशी इकॉनॉमी वर्गाचे आणि सगळ्यात जवळच्या मार्गाचे असायला हवे.
    b) प्रवास सहायका ची निवड पूर्णपणे शिष्यवृत्ती धारका वर सोडण्यात आली आहे. आरक्षण शुल्क, अतिरिक्त सामानाचे शुल्क, रद्द करण्याचे शुल्क, इतर वरकड गोष्टी इ. ची परिपूर्ती होणार नाही.
    c) शिष्यवृत्तीधारक, विश्वविद्यालयात दाखल झाल्यानंतर, विश्वविद्यालायकडून रुजू झाल्याचे प्रतिवेदन संबंधित परदेशी भारतीय दूतावासाकडे सादर करून विमानभाडे परत मागू शकतात. सुधारित अटी १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील.
    d) परतीचे तिकीट परदेशी भारतीय दूतावासातर्फे आरक्षित केले जाईल
    14 इंग्रजी भाषा किंवा इतर चाचण्यांना उपस्थित राहण्यासाठी लागणारे परीक्षा शुल्क परदेशातील संस्था/ विश्वविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी ज्या इंग्रजी भाषा किंवा इतर चाचण्या (जीआरई, जीएमएटी, टीओईएफएल, आयईएलटीएस इ.), आवश्यक आहेत, त्यांना उपस्थित राहण्यासाठी एकदाच द्यायचे परीक्षा शुल्क, भारतीय दूतावासा द्वारे परिपूर्त केले जाईल. ह्या परिपूर्तीची कमाल मर्यादा रु.५०,०००/- आहे.
    15 स्थानिक प्रवास उतरलेल्या गावापासून शिक्षण संस्थेपर्यंत आणि परतीच्या प्रवासाचे द्वितीय श्रेणीचे रेल भाडे. जर अशी जागा दूर असेल आणि रेल्वेने जोडलेली नसेल, तर राहण्याच्या जागेपासून सर्वात जवळच्या रेल्वे स्थानकपर्यंतचे बस भाडे, होडीनी ओलांडायचे प्रत्यक्ष भाडे, सर्वात जवळच्या रेल्वे-सह-विमानतळापर्यंत विमान भाडे आणि/किंवा उतरण्याच्या गावापासून आणि परत, सर्वात जवळच्या रस्त्याचे द्वितीय श्रेणी रेल भाडे, भारतीय दूतावासाकडून परिपूर्त केले जातील.
    16 संशोधन / शिक्षक सहायकाचे काम करून मिळवलेले उत्पन्न शिष्यवृत्तीधारकांना, त्यांना मिळणाऱ्या भत्याना पूरक म्हणून संशोधन / शिक्षक सहायकाचे काम करण्यास परवानगी आहे. याची कमाल मर्यादा अमेरिकन $ २४००/- (अमेरिकन डॉलर दोन हजार चारशे फक्त) प्रति वर्षी आणि इंग्लंडमधील शिष्यवृत्तीधारकांसाठी १५६०/- पौंड (एक हजार पाचशे साठ पौंड) प्रति वर्षी, अशी आहे. (जर हे उत्पन्न) स्वीकार्य कमाल मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर योजनेमधील वार्षिक देखभाल भत्ता त्या अनुषंगाने कमी केला जाईल.

    योजनेचा प्रकार

    पाठ्यवृत्ती

    योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

    • उमेदवारांनी, योजनेच्या अटींप्रमाणे, आपली पात्रता आणि योग्यता पारखून, दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाकडे अर्ज करावा. दुरदृष्यप्रणालीद्वारे (ऑनलाइन) अर्ज करण्याची पद्धत विकसित करून कार्यरत झाल्यानंतर, त्याद्वारेच अर्ज मागवण्यात येतील. उमेदवाराने, योग्य प्रकारे भरलेला अर्ज (विभागाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध) आवश्यक कागदपत्रांसहित विभागाकडे सादर करावा. नोकरदार उमेदवारांनी, आपल्या नियोक्त्याकडून “ना हरकत प्रमाणपत्र” (एनओसी) घेऊन, या विभागाकडे सादर करणे आवश्यक आहे.
    • योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, सर्व अर्ज, पडताळणी समितीद्वारे तपासले जातील. पडताळणी समितीद्वारे अल्पसूचित केले गेलेले पात्र उमेदवार, निवड समितीकडे पाठवले जातील. निवड समिति, पात्र उमेदवारांचे, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, त्यांच्या अपंगत्वाचा प्रकार आणि टक्केवारी, ते प्रवेश घेत असलेला परदेशातील अभ्यासक्रम आणि विश्वविद्यालय इ. निकषांवर मूल्यांकन करून, वार्षिक मंजूर जागांएवढी, एक गुणवत्ता सूची तयार करेल. यानंतरच, निवड प्रक्रिया, पूर्णपणे पार पडली असे म्हणता येईल.
    • कोणत्याही टप्प्यावर संस्था/महाविद्यालय/विश्वविद्यालय बदलण्याची विनंती विचारात घेतली जाणार नाही. जर शिष्यवृत्ती धारक, अभ्यासक्रम अथवा विश्वविद्यालयात बदल इच्छित असेल, तो/ती नव्याने अर्ज करु शकतात.
    • शिष्यवृत्तीधारकास, शिष्यवृत्ती निश्चितीचे पत्र दिल्यानंतर, त्याने/तिने, मूळ कागदपत्रांची पडताळणी, बंधपत्र सादर करणे, पतदारी प्रमाणपत्र इ. प्रक्रिया, पुढील ६ महिन्यात पूर्ण करायला हव्यात. असे न केल्यास, शिष्यवृत्ती निश्चितीचे पत्र आपोआप रद्द होईल. या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ दिला जाणार नाही.

    योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

    ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.

    लाभार्थी:

    प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांना, परदेशी, खालील विशिष्ठ अभ्यास क्षेत्रांमध्ये, पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम आणि विद्यावाचस्पती पदवी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य करणे: अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शुद्ध विज्ञान आणि उपयोजित विज्ञान कृषी विज्ञान आणि वैद्यकशास्त्र वाणिज्य, पुस्तपालन (अकाउंटिंग) आणि वित्त आणि मानवता, कायदा आणि ललित कलांसह सामाजिक विज्ञान.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे