उद्दिष्टे आणि कार्ये
उद्दिष्टे
ह्या विभागाची प्राथमिक उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :-
- दिव्यांग व्यक्तींच्या अंगभूत प्रतिष्ठेचा आदर, वैयक्तिक स्वायक्तेसह स्वातंत्र आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे. तसेच आत्मनिर्भर होण्यास मदत करणे.
- भेदभाव न करणे.
- समाजातील सर्व पैलूंमध्ये पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींचा सहभाग आणि समावेश होण्यासाठी प्रयत्न करणे.
- दिव्यांग व्यक्तींच्या विविधतेची स्वीकृती करणे. दिव्यांग व्यक्तींचीभिन्नता आणि स्वीकृती आणि मानवतेचा आदर करणे.
- दिव्यांग व्यक्तींसाठी संधीची समानता उपलब्ध करुन देणे.
- अडथळामुक्त आणि सुगम्य वातावरण निर्माण करणे.
मूल्ये
- सहयोग
एकसमान ध्येयासाठी संयुक्तपणे काम केल्याने केवळ खूप मोठा प्रभाव निर्माण होते. तसेच त्या सहभागी होत असलेल्या सर्वांच्या मुल्यांचे संवर्धन होते असा आमाचा विश्वास आहे. - समर्पण वृत्ती
विभागाकडून केलेल जाणारे कार्य आणि घेण्यात आलेले निर्णय आमच्या ध्येयाशी निगडीत करुन आम्ही आपल ध्येयाशी वचनबध्द आहोत. - सर्वसमावेशक
वातावरण निर्मिती, सहानुभूती, सुगमता अशा गुणांचा पुरस्कार करून आणि आमच्या कार्यामध्ये या सर्वाचा समावेश असलेला समाज निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे. - प्रेरणा
दिव्यांग व्यक्तींच्या मनात आशावादाचीभावना निर्माण करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. - पारदर्शकता
आम्ही विविध विचार आणि मतांचे स्वागत करतो. तसेच आम्ही देत असलेल्या सेवा लोकांच्या फायद्यासाठी आहेत. माहितीची देवाण- घेवाण करण्यासाठी सन्मानपूर्वक संवेदनशील आहोत. - विश्वासाहर्ता
राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठीआम्हीआमची कर्तव्ये उत्कृष्ट व सचोटीने पार पाडतो.
कार्ये
- राज्यात अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि विविध धोरणे तसेच दिव्यांगांशी संबंधीत अन्य अधिनियमांची अंमलबजावणी करणे.
- राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
- राज्यात अनुदाने, शिष्यवृत्ती, प्रोत्साहानात्मक अनुदाने यांचे वितरण व अंमलबजावणीवर नियंत्रण करणे.
- राज्यात माहिती व आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा वापर करुन ई-ऑफीस द्वारे कामकाज करणे.
- विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे.
- विविध कार्यक्षेत्रातील वेळोवेळी नमूद केलेल्या प्रमुख कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
- दिव्यांग क्षेत्रामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद यांना प्रोत्साहन देण्यासाठी परिषदा, कार्यशाळा, दूरदृश्य प्रणाली परिसंवाद आणि प्रदर्शनांचे आयोजन करणे.