शासकीय संघटनांसाठी
एका सर्वसमावेशक समाजाची निर्मिती, वैयक्तिक प्रयत्नाच्या पलीकडे जाऊन एक सामूहिक जबाबदारी आहे, असा आमचा विश्वास आहे. हा विभाग, दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण आणि समावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि आम्ही तुम्हाला, एक असा समाज निर्माण करण्यासाठी निमंत्रण देत आहोत, जिथे, प्रत्येकजण, आपल्या सर्व क्षमतांसह, यशस्वी होईल आणि हातभार लावेल. हा विभाग आणि तुमच्यासारख्या विभागाच्या सहकार्याची शक्ति वापरुन, निर्बंध तोडून, आपण एक चिरस्थायी परिवर्तन आणून, सर्वसमावेशक भविष्याकडे वाटचाल सुरू करु शकतो. चला, एकत्र मिळून, लक्षणीय प्रभाव पाडून, दिव्यांग व्यक्तींना, आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्यासाठी आणि फोफावण्यासाठी सक्षम बनवूया.
तुम्ही कशा प्रकारे मदत करु शकता ?
तुम्ही तुमच्या विभागामद्धे बदलांची सुरवात करून, महत्वाची भूमिका निभावू शकता.
- सर्वसमावेशक भरतीचे धोरण : सर्वसमावेशक भरती करण्याची प्रथा पडून, तुम्ही, कामाच्या ठिकाणी, विविधता आणि सर्वसमावेशकतेला भरीव प्रोत्साहन देऊ शकता. दिव्यांग व्यक्तींना नोकऱ्या देण्यास प्रोत्साहन द्या आणि कामाच्या ठिकाणी सुगम आणि सहायक वातावरण निर्माण करा.
- सुगमता आणि सुविधा : दिव्यांग व्यक्तींसाठी, कामाची जागा सुगम असेल याची खात्री करा. वाजवी सुविधा, जशा की, सहायक तंत्रज्ञान, अनुकूल उपकरणे किंवा कामाची परिवर्तनशील व्यवस्था, पुरवून त्यांच्या आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.
- संवेदीकरण आणि प्रशिक्षण : अपंगत्वासंबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी, कर्मचाऱ्यांकरता संवेदीकरण शिबिरे आणि प्रशिक्षण सत्रे आयोजित करा आणि सर्वसमावेशकता व सन्मानपूर्ण वातावरण निर्मितीला प्रोत्साहित करा.
- रोजगाराच्या संधीची उपलब्धता: दिव्यांग व्यक्तींच्या भोवती असणारी सामाजिक नकारात्मकता कमी करण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. सर्वसमावेशक भरती करण्याची पद्धत अवलंबून, दिव्यांग व्यक्तींना नोकरी, प्रशिक्षूत्व आणि प्रकल्प संधि देण्यासाठी आम्ही तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो.
- कारकीर्द विकासासाठी समान संधी : दिव्यांग व्यक्तींना कारकीर्द विकासासाठी समान संधी मिळवून द्या. त्यांना प्रशिक्षण कार्यक्रम आणि मार्गदर्शनाच्या संधी देऊन, कारकिर्दीत पुढे जाण्यास मदत करा.
- कामाच्या जागी सहायक धोरणे: दिव्यांग कर्मचाऱ्यांसाठी, सहायक धोरणे तयार करा, ज्यामधे त्यांच्या आवश्यकतेनुसार रजेसबंधी धोरण, कामाचा परिवर्तनशील वेळ आणि आरोग्यासाठी कार्यक्रम समाविष्ट असतील.
- दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगण्यास मदत करा : दिव्यांग समुदायाकडून खरेदी करून, तुम्ही त्यांच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देता आणि त्यांच्या आर्थिक सक्षमतेला प्रोत्साहन देण्यात एक महत्वाची भूमिका निभावता. तुमच्या निगमिय भेटवस्तूंसाठी, दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या वस्तूंना प्राधान्य द्या.
- दिव्यांग व्यक्तींना निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सामील करा : दिव्यांग व्यक्तींशी सल्लामसलत करूनत्यांना धोरणे बनवायच्या आणि निर्णय घ्यायच्या प्रक्रियेत सामील करून, आपण त्यांचा आवाज ऐकला जाईल आणि अपंगत्वाशी संबंधित उपक्रम तयार करताना त्यांचा दृष्टीकोन विचारात घेतला जाईल ह्याची खात्री करु शकतो.
- दिव्यांग व्यक्तींना, एक स्वतंत्र लक्ष्य समजून, तुमच्या योजना आणि सेवांमधे समाविष्ट करून घ्या.
- दिव्यांग व्यक्तींसाठी मजकूर घालणे