बंद

    सहभागी होऊया

    • आपला आवाज उंचवा. समर्थक बना !

    या प्रेरणादायी जीवन कथा, लोकांपर्यंत पोचवण्यासाठी मिळालेल्या तुमच्या प्रोत्साहनामुळे, आम्हाला, सर्वसमावेशनाचा संदेश पसरवण्याची संधी मिळते. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींचे समाजात स्वागत करून, विजेता बना.

    • परिवर्तनाचा घटक बना. दान करा !

    तुम्ही सुद्धा परिवर्तन आणू शकता. प्रत्येक देणगी, लहान अथवा मोठी, बदल घडवून आणू शकते. तुमचे योगदान, दिव्यांग व्यक्तींना प्रशिक्षण, वैद्यकीय मदत, सहायक तंत्रज्ञान प्रदान करून आणि शिक्षण, व्यवसाय, सामाजिक सहाय्य आणि इतर मूलभूत गरजांमध्ये सुगमता आणून, स्वावलंबी बनण्यासाठी मदत कारु शकते.

    • सर्व काळजीवाहकांना : तुम्ही एकटे नाही आहात.

    तुम्ही काळजीवाहक आहात का ?

    दिव्यांग व्यक्तींची काळजी घेणं, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या दमछाक करणारं असू शकतं, याची आम्हाला कल्पना आहे, पण आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एकटे नाही आहात. मदतीसाठी, कुठे आणि कुणाला विचारायचं ह्याची माहिती असणं, अनिश्चितता आणि दमछाक कमी करतं. आपल्या जवळच्या व्यक्तीची परिस्थिति, उपचार, व्यवस्थापन आणि प्रगती अशा बाबींबद्दल माहिती असण्याने, योग्य काळजी घेता येते आणि भविष्यातील घडामोडींसाठी तयारी करता येते. याकरता, आम्ही एक काळजीवाहकांसाठी अंकीय (डिजिटल) पुस्तिका तयार केली आहे, जी तुम्हाला आयुष्य प्रभावीपणे जगणे, काम / काळजीवाहन आणि तुमचा वैयक्तिक वेळ यामध्ये संतुलन आणण्यासाठी मदत करेल. याव्यतिरिक्त, भावनिक ओझे कमी करण्यासाठी, तुम्ही काळजीवाहक समुदायाचा घटक बनू शकता, ज्यायोगे तुम्ही देशभरातील काळजीवाहकांशी संवाद साधू शकता.