बंद

    वारंवार विचारले जाणारे प्रश्न

    जागरूकता आणि समर्थन

    दिव्यांग व्यक्तींची (वेगवेगळ्या सक्षम/अपंग व्यक्ती) व्याख्या काय आहे?
    अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम 2016 नुसार अशी व्यक्ती जी, दीर्घकालीन शारीरिक, मानसिक, बौद्धिक अथवा संवेदनाक्षम दौर्बल्य असून, जी समाजात सहभागी होताना इतरांसोबत विविध अडथळ्यांमुळे संवाद साधू शकत नाही.
    केंद्र शासनाच्या दिव्यांग व्यक्तीं हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांगत्वाचे 21 प्रवर्ग निश्चित केले आहेत, ते खालीलप्रमाणे आहेत :-
    1. पूर्णत: अंध
    2. अंशत: अंध
    3. कुष्ठरोग निवारीत/मुक्त
    4. कर्णबधीर/ कमी ऐंकू येणे
    5. अस्थिव्यंग
    6. शारिरीक वाढ खुंटणे
    7. बौद्धिक अक्षम
    8. मानसिक आजार
    9. स्वमग्न
    10. मेंदूचा पक्षाघात
    11. स्थायुंची विकृती
    12. मज्जासंस्थेचे तीव्र आजार
    13. विशिष्ट अध्ययन अक्षम
    14. हातापायातील स्थायू कमजोर/शिथील होणे
    15. वाचा /भाषा दोष
    16. रक्ताची कमतरता
    17. अधिक रक्तस्त्राव
    18. रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होणे
    19. बहुविकलांग
    20. आम्ल हल्ला पिडीत
    21. कंपवात

    1. माझ्या समुदायातील दिव्यांगत्व जागरुकतेबाबत मी काय व कसे योगदान देऊ शकतो?

    प्रत्येक प्रयत्न कितीही लहान असला तरी तो सकारात्मक बदलाची पहिली पायरी होतो. दिव्यांगत्व जागरुकतेबाबतच्या प्रयत्नांमध्ये आपल्या सक्रीय सहभागामुळे दिव्यांग व्यक्तींना समाविष्ट करुन घेणारा सहानुभूती समुदाय प्रत्येकासाठी निर्माण होऊ शकतो.

    दिव्यांगत्व जागरुकता व समर्थनासाठी आपण खालील पध्दतीने आपला सहभाग देऊ शकता :-

    1) दिव्यांगत्वासाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थांमध्ये सदस्य होणे – आपल्या भागातील दिव्यांगत्वासाठी काम करणा-या राष्ट्रीय अथवा स्थानिक स्वयंसेवी संस्थांचा शोध घेऊन सदस्य व्हा. सदर संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये अथवा मोहिमांमध्ये स्वयंसेवक म्हणून सक्रीयपणे काम करु शकता.

    2) जागरूकता वाढविणे – दिव्यांग व्यक्तींचे हक्क, त्यांना भेडसावणा-या विविध समस्या / आव्हाने तसेच समाजामध्ये समाविष्ट होण्याचे महत्व याबाबत विविध कार्यक्रम व उपक्रमांमधून समाजामध्ये दिव्यांगत्वाबद्दलची जागरुकता वाढविणे.
    3) अडथळामुक्त प्रवेशासाठी जागरुकता निर्माण करणे – दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी इमारती, वाहतूक आणि डिजिटल प्लॅटफॉर्म इत्यादी ठिकाणी अडथळामुक्त प्रवेशाची सोय /व्यवस्था करण्यासाठी जागरुकता निर्माण करणे. दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध संस्था आणि व्यावसायिकांना प्रोत्साहन देणे.
    4) सर्वसमावेशक शिक्षणासाठी मदत/समर्थन देणे – शाळा व महाविद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणे. तसेच त्यांच्या शैक्षणिक गरजा आणि अनुकूल निवास व्यवस्था देणा-या कार्यक्रमांना सहाय्य करणे.
    5) रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहित करणे- विविध व्यवसाय व कामाच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींना सामावून घेण्याच्या पध्दतीसाठी प्रयत्न करणे. दिव्यांग व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी आणि सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी व्यवसायिकांना प्रोत्साहित करणे.
    6) कार्यशाळा आणि प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणे – समाजात दिव्यांगत्वाबाबत जागरुकता व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी शाळा, कामाची ठिकाणे व सामुदायीक संस्था इत्यादी ठिकाणी विविध कार्यशाळा व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करणे.
    7) प्रचार माध्यमामध्ये प्रतिनिधीत्व करणे – विविध माध्यमे व करमणूकीच्या क्षेत्रामध्ये दिव्यांग व्यक्तींचे योग्य व अचूक प्रतिनिधित्व करणे. स्टिरियोटाइपला आव्हान देणाऱ्या सकारात्मकचित्रणास प्रोत्साहन देणे.
    8) दिव्यांग व्यक्तींचे सहकार्य करणे – निर्णय प्रक्रियेमध्ये दिव्यांग व्यक्तींचे म्हणणे ऐकून घेतले जाईल याची खात्री करुन त्यांच्या समर्थनार्थ त्यांचा समावेश करण्यासाठी सहकार्य करा.
    9) अडथळामुक्त मनोरंजनाचे समर्थन करणे – समाजात दिव्यांग व्यक्तींच्या मनोरंजन सुविधांसाठी अडथळामुक्त प्रवेशाचे वातावरण निर्माण करणे.
    10) कायदेशीर हक्कांची माहिती देणे – दिव्यांगत्वा संबंधित कायद्याची वेळोवेळी माहिती घेऊन सदर कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणे.
    11) दिव्यांगत्व समर्थनासाठी समाज माध्यमांचा वापर करणे – दिव्यांगत्वाबाबतची माहिती तसेच त्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी समाज माध्यमांचा वापर करणे. तसेच त्यासाठी आयोजित केलेल्या विशेष मोहिमा व कार्यक्रमांना प्रोत्साहन देणे.
    12) सहयोगी बना – दिव्यांग व्यक्तींना आधार व समर्थन देणारे सहयोगी बना. दिव्यांग व्यक्तींच्या आवश्यकता व अनुभव ऐकून त्यांच्याबाबत होणाऱ्या भेदभावाच्या विरोधात उभे रहा.

    2. दिव्यांग व्यक्तींबाबतच्या गैरसमजूती काय आहेत ?

    दिव्यांग व्यक्तींबाबत समाजात अनेक गैरसमजूती व पारंपारीक विचारसरणी आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींबाबत समाजात गैरसमजूती, भेदभाव आणि प्रवेश नाकारला जाऊ शकतो. यापैकी काही गैरसमजूती खालीलप्रमाणे आहेत:-

    1) असहायता – दिव्यांग व्यक्ती पूर्णपणे इतरांवर अवलंबून आहेत आणि स्वतंत्र जीवन जगण्यास असमर्थ आहेत असे गृहीत धरले जाते. तथापि, प्रत्यक्षात अनेक दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी असून समाजामध्ये आपले योगदान देत आहेत.
    2) दया- दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या स्वत:च्या शक्ती व आकांक्षा असलेल्या व्यक्ती न मानता त्यांना सहानुभूती दाखवून त्यांच्याबद्दल खेद व्यक्त केला जातो.
    3) ओझे – दिव्यांग व्यक्तींचे समाजातील संभाव्य योगदान न ओळखता त्यांना समाजावरचे अथवा कुटुंबावरचे ओझे म्हणून पाहिले जाते.
    4) असमर्थता- विविध क्षेत्रांमध्ये दिव्यांग व्यक्तींना यश प्राप्त करणे अथवा उत्पादक होण्यासाठी असमर्थ आहेत असे गृहीत धरून त्यांच्यामधील विशिष्ट कौशल्याकडे तसेच प्रतिभेकडे दुर्लक्ष केले जाते.
    5) एकसमानता – दिव्यांगत्व असलेल्या व्यक्तींमधील विविधता आणि त्यांच्या क्षमता यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा एकसमान गट केला जातो.
    6) बनावट दिव्यांगत्व – काही व्यक्ती दिव्यांगत्वाचे फायदे मिळविण्यासाठी दिव्यांग असल्याचे अथवा दिव्यांत्वाची अतिशयोक्ती दाखवितात.
    7) योगदान देण्यास असमर्थता – दिव्यांग व्यक्ती समाजात अथवा कामाच्या ठिकाणी अर्थपूर्ण योगदान देऊ शकत नाहीत असे गृहीत धरुन कामाच्या ठिकाणी त्यांचा भेदभाव केला जातो.

    3. दिव्यांग व्यक्तींना सामना करावयास लागणा-या विविध अडचणींबाबत मी स्वत:ला आणि इतरांना कशा प्रकारे शिक्षित करु शकतो?

    वेगवेगळ्या दिव्यांगांना येणाऱ्या आव्हानांबद्दल स्वतःला आणि इतरांना शिक्षित करणे हे सर्वसमावेशक आणि सहानुभूतीपूर्वक समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असून, ती सतत चालणारी प्रक्रिया आहे. स्वत:ला व इतरांना शिक्षित करण्याचे परिणामकारक मार्ग खालीलप्रमाणे आहेत :-

    1) पुस्तके आणि लेख वाचणे – अपंगत्वाचे अधिकार, दिव्यांग व्यक्तींचे अनुभव, आणि त्यांच्यासमोर असलेली आव्हाने इत्यादीबाबतचे लेख, पुस्तके आणि संशोधन पेपरचा शोध घेणे. हे तुम्हाला उपयुक्त आकलन आणि वैविध्यपूर्ण दृष्टीकोण प्रदान करेल.
    2) माहितीपट आणि चित्रपट पहा – दिव्यांग व्यक्तींचे जीवन आणि संघर्ष यावर अनेक माहितीपट व चित्रपट तयार करण्यात आलेले आहेत. दिव्यांगत्वाबाबत जागरूकता वाढवणे आणि सहानुभूती वाढवण्यासाठी ही महत्वाची शक्तीशाली साधने आहेत.
    3) दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांचे सदस्य होणे – दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था अथवा गटांचे सदस्य होणे. सदर संस्था दिव्यांग व्यक्तींच्या समोरील आव्हाने, शैक्षणिक संसाधने, गोष्टी/कथा इत्यादीबाबतची माहिती उपलब्ध करतात.
    4) कार्यशाळा आणि वेबिनारमध्ये सहभागी व्हा – दिव्यांग व्यक्तींचे अधिकार आणि त्यांचा समाजामधील समावेश याबाबत त्यांच्या कार्यशाळा, वेबिनार आणि सेमिनार यांचा शोध घेणे. हे कार्यक्रम तज्ञांकडून शिकण्यास तसेच या विषयात स्वारस्य असलेल्या इतर लोकांशी चर्चा करण्याची संधी उपलब्ध करुन देतात.
    5) दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधणे – दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधणे व त्यांचे अनुभव प्रत्यक्ष समजून घेण. त्यांच्या गोष्टी/कथा, त्यांनी पार केलेली आव्हाने आणि त्यांचा दृष्टीकोन याचा सन्मान करणे.
    6) दिव्यांग संस्थांचे स्वयंसेवक म्हणून काम करणे – दिव्यांग व्यक्तींचे कल्याण आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे स्वयंसेवक म्हणून काम करणे. स्वयंसेवक म्हणून काम केलेला प्रत्यक्ष अनुभव दिव्यांग व्यक्तींच्या जीवनातील विविध अडचणी/आव्हाने समजून घेण्यास मदत करतो.
    7) सर्वसमावेशक भाषा वापरणे – दिव्यांग व्यक्तींशी संवाद साधताना भाषेची योग्य काळजी घेणे. अपंग व्यक्तींचा संदर्भ देताना आक्षेपार्ह भाषा अथवा अपमानास्पद शब्दांचा वापर करु नये. प्रथम वचनी भाषा वापरावी जी व्यक्तीवर जोर देते, त्यांच्या दिव्यांगत्वावर नाही.
    8) पारंपारीक रुढी व गैरसमजांना आव्हान देणे – लोकांच्या मनात दिव्यांगत्वाबाबत पारंपारीक रुढी आणि गैरसमज दूर करण्यासाठी काम करणे आणि यासाठी इतरांनाही प्रोत्साहित करणे.
    9) अडथळामुक्त प्रवेशासाठी जागरुकता निर्माण करणे – दिव्यांग व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी कामाच्या ठिकाणी व समाजामध्ये वावरताना अडथळामुक्त प्रवेशासाठी पायाभूत सुविधा व सेवा उपलब्ध करुन देणे. दिव्यांगांच्या समाजातील सर्वसमावेशनासाठी अडथळामुक्त प्रवेश हा निर्णायक आहे.
    10) समाज माध्यमांवर माहिती उपलब्ध करणे – तुम्ही तुमच्या समाज माध्यमांद्वारे दिव्यांग व्यक्तींच्या शैक्षणिक अधिकारांबाबतची माहिती आणि दिव्यांग व्यक्तींनी अडचणींसोबत केलेला सामना याबाबतची माहिती उपलब्ध करुन देणे. याद्वारे अन्य समाज घटकांमध्ये दिव्यांगांबाबत जागरुकता निर्माण करणे.
    11) दिव्यांगत्व जागरूकता कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे – दिव्यांगत्व जागरुकता महिना अथवा जागतिक दिव्यांग दिन अशा दिव्यांगत्वाबाबत जागरुक करणाऱ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून सहकार्य करणे. संघटित होऊन याबाबत अधिक कार्य करणे.
    12) सर्वसमावेशी धोरणांचे समर्थन करणे – दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक, राष्ट्रीय, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करणे.

    4. दिव्यांग व्यक्तींना रोजगार आणि अडथळामुक्त प्रवेश,सुलभतेसाठी कोणते अधिकार आहेत?

    भारतात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 द्वारे दिव्यांग व्यक्तींच्या रोजगाराचे आणि अडथळामुक्त प्रवेश/सुलभतेचे अधिकार संरक्षित केले असून, त्यांना प्रोत्साहन दिले जाते. (या सर्वसमावेशक कायद्याचे उद्दिष्ट समान संधी सुनिश्चित करणे, भेदभाव न करता जीवनाच्या विविध भूमिकेमध्ये पूर्ण सहभाग ज्यामध्ये रोजगार आणि अडथळामुक्त प्रवेशाचा समावेश आहे.

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील काही प्रमुख तरतूदी खालीलप्रमाणे आहेत :-

    रोजगाराचे हक्क –

    1) सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण – दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अन्वये दिव्यांग व्यक्तींसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण रिक्त पदांच्या 4% पदे आरक्षित करण्यात आली आहेत. सदर आरक्षण हे नागरी पदे आणि सेवा या दोन्हींना लागू आहे
    2) नियुक्ती अधिकाऱ्यांना प्रोत्साहन/उत्तेजन – 2016 चा अधिनियम कायदा खाजगी नियोक्त्यांना अपंग व्यक्तींना नियुक्ती देण्यासाठी प्रोत्साहित करतो. यामध्ये आर्थिक सहाय्य, कर लाभ आणि अडथळामुक्त प्रवेशासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी सहाय्य, इत्यादींचा समावेश आहे.
    3) भेदभाव न करण्याचे धोरण – दिव्यांग व्यक्तींविरुध्द भरती, नोकरी प्रशिक्षण, पदोन्नती आणि इतर दिव्यांग रोजगाराशी संबंधीत बाबी याबाबत भेदभाव करण्यास मनाई केली आहे.
    4) योग्य प्रमाणात निवास व्यवस्था – दिव्यांग व्यक्तींना त्यांचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी नियोक्त्यांनी वाजवी निवासी व्यवस्था आणि सहाय्यक उपकरणे उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
    5) कामाच्या ठिकाणी सुलभता- या कायद्यान्वये सर्व सार्वजनिक आणि खाजगी संस्था व आस्थापना यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करणे अनिवार्य आहे.
    6) विशेष रोजगार विनिमय केंद्र – या कायद्यान्वये दिव्यांग व्यक्तींना नोकरीची नियुक्ती सुलभ करण्यासाठी विशेष रोजगार विनिमय केंद्र उपलब्ध करण्याचे निश्चित केले आहे.

    अडथळामुक्त प्रवेशाचा अधिकार –

    1) अडथळामुक्त प्रवेशासाठी सुलभ पायाभूत सुविधा – सार्वजनिक आणि खाजगी इमारती, रस्ते, वाहतूक आणि इतर सुविधा दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त प्रवेशासाठी उपलब्ध करण्यासाठी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 या अन्वये महत्व दिले जाते.
    2) सुलभ माहिती व संवादाची सुविधा – या अधिनियमान्वये संस्थांनी त्यांची माहिती व संवादाची सुविधा दिव्यांग व्यक्तींसाठी शक्य अथवा उपलब्ध असलेल्या ब्रेल, श्राव्य किंवा मोठ्या आकारामध्ये छापणे यासारख्या स्वरुपात माहिती उपलब्ध करुन देणे अनिवार्य आहे.
    3) शैक्षणिक सुलभता – शैक्षणिक संस्थांनी दिव्यांग विद्यार्थ्यांचा पूर्ण सहभाग आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यासाठी त्यांना वाजवी निवास व्यवस्था उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
    4) सुलभ तंत्रज्ञान – दिव्यांग व्यक्तींचा समाजातील सुलभता वाढविण्यासाठी सहाय्यक तंत्रज्ञानाचा विकास व वापर करण्यास प्रोत्साहन देतो.
    5) सार्वजनिक वाहतूक सुलभता – दिव्यांग व्यक्तींना प्रवेशयोग्य सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करणे अनिवार्य आहे.
    6) प्रवेशयोग्यता प्रमाणपत्र – दिव्यांग व्यक्तींना अडथळामुक्त प्रवेशाची सोय करण्याच्या सुनिश्चित केलेल्या मानकांचे पालन केलेल्या इमारती आणि उपलब्ध केलेल्या सेवा यासाठी या अधिनियमान्वये प्रमाणपत्र देण्यात येते.

    दिव्यांग व्यक्तींना सहाय्य करण्यासाठी सुरु केलेल्या उपक्रमामध्ये मी माझ्या सेवा किंवा मदत कशा प्रकारे देऊ शकतो?

    दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या विविध व्यक्ती, कॉर्पोरेट आणि सरकारी संस्था ज्या पध्दतीने अथवा मार्गांनी कार्य करतात त्याबाबत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

    शाळा आणि कार्यालयांच्या ठिकाणी दिव्यांगत्व जागरूकता वाढवण्याचे प्रभावी मार्ग कोणते आहेत ?

    शाळा आणि कार्यालयांच्या ठिकाणी विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यामध्ये दिव्यांगत्वाबद्दल गैरसमज दूर करुन सर्वसमावेशकता, सहानुभूती इ.बाबत जागरुकता वाढविणे महत्वाचे आहे. हे साध्य करण्यासाठी खालील प्रकारे काम करता येते:-
    – दिव्यांग जनजागृती कार्यशाळा
    – शाळा व कार्यालयांच्या ठिकाणी सर्वसमावेशक अभ्यासक्रम
    – आदर्श व्यक्ती व मान्यवरांचे मार्गदर्शन
    – दिव्यांगांबाबत संवेदनशीलता वाढविण्यासाठी उपक्रम
    – अडथळामुक्त प्रवेश सुविधा
    – सर्वसमावेशक धोरणे
    – दिव्यांग जागरुकता मोहिमा/शिबीरे
    – दिव्यांगांचा समावेश असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन
    – कार्यालयांच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी सहाय्य व समर्थन करणाऱ्या संसाधन गट निर्मिती
    – कर्मचाऱ्यासाठी दिव्यांगत्व जागरुकता कार्यक्रम
    – विविध दिव्यांगत्व जागरुकता दिवस साजरे करणे
    – सर्वसमावेशक भरती प्रक्रिया

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आपण सर्वसमावेशक शिक्षण कसे सुनिश्चित करू शकतो?

    • सर्व शाळांमध्ये दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, 2016 मधील दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या तरतूदीची अंमलबजावणी करून, सर्वसमावेशक व स्वागतार्ह वातावरण निर्माण करू शकतात. अशा वातावरणांमध्ये दिव्यांग विद्यार्थी त्यांच्या समवयस्कांच्या बरोबरीने शैक्षणिक, सामाजिक आणि भावनिकदृष्ट्या प्रगती करू शकतात. सर्वसमावेशक शिक्षणामध्ये विविधता, सहानुभूती आणि स्वीकृती यांना प्रोत्साहन दिल्यामुळे दिव्यांग विद्यार्थीना यांचा फायदा होतो.
      वैविध्यपूर्ण शिक्षण शैली व क्षमता पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक अभ्यासक्रम तयार करणे. दिव्यांग विद्यार्थासह अन्य विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनुकूल असे लवचिक शिक्षण साहित्य आणि मूल्यांकन तयार करणे याचा समावेश आहे.

    • व्यावसायिक विकास: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना समावेशक अध्यापन पद्धती, दिव्यांगत्व जागरुकता आणि सहाय्यक तंत्रज्ञान वापर करणे सुलभ व्हावे यासाठी वेळोवेळी आवश्यक ते व्यवसायिक विकासात्मक प्रशिक्षण देणे.
    • अडथळामुक्त प्रवेशासाठी पायाभूत सुविधा: दिव्यांग विद्यार्थांसाठी वर्गखोल्या, शाळेचा परिसर व इतर सुविधा प्रवेश योग्य असावेत. यामध्ये रॅम्प, लिफ्ट, प्रवेशयोग्य स्वच्छतागृहे आणि आरक्षित पार्किंगची जागा उपलब्ध करणे याचा समावेश आहे.
    • सहाय्यक तंत्रज्ञान आणि संसाधने: दिव्यांग विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वर्गामध्ये सहाय्यक तंत्रज्ञान आणि विविध शैक्षणिक संसाधनांचा वापर करावा. यामध्ये स्क्रीन रीडर, ब्रेल साहित्य, टेक्स्ट-टू-स्पीच सॉफ्टवेअर आणि अनुकूल शिक्षण साहित्य यांचा समावेश असावा.
    • सहयोग आणि सांघिक कार्य: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी सामान्य शिक्षक, विशेष शिक्षक, थेरपिस्ट आणि सहाय्यक कर्मचारी यांच्यातील सहकार्यास प्रोत्साहन देणे.
    • समवयस्क समर्थन कार्यक्रम: सामान्य विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांशी संवाद साधु शकतात. तसेच त्यांना पाठींबा देऊ शकतात, अशी सकारात्मक आणि आश्वासक शालेय संस्कृती तयार करणे. असे कार्यक्रम दिव्यांग व्यक्त्तींच्या सामाजिक समावेशास प्रोत्साहन आणि गैरसमजूती दूर करु शकतात.
    • सर्वसमावेशक अभ्यासोत्तर उपक्रम: दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासोत्तर उपक्रम, उदा. क्रीडा, कला आणि क्लब इत्यादी त्यांच्या क्षमतांचा विचार न करता सर्वसमावेशक आणि प्रवेशयोग्य असावेत.
    • सकारात्मक विस्तार: दिव्यांग विद्यार्थ्याचे यश साजरे करणे. तसेच त्यांच्यातील आपलेपणा आणि आत्मसन्मान वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.
    • सर्वसमावेशक मूल्यांकन: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध गरजा पूर्ण करणाऱ्या मूल्यांकन पद्धती विकसित करणे. त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये प्रदर्शित करण्याची संधी देवून त्यांची समाजातील स्थान /समानता निश्चित करण्यास मदत करणे.
    • नियमित प्रगती निरीक्षण: दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक विकासाचे मूल्याकंन करण्यासाठी नियमित प्रगती निरीक्षण प्रणाली लागू करणे. आवश्यकतेनुसार या प्रणालीचा निर्देशात्मक धोरणे तयार करणे तसेच समर्थन मिळवण्यासाठी वापर करणे.
    • पालक आणि समुदायिक सहभाग: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व समावेशक शिक्षण प्रक्रियेत पालक आणि समाजास सहभागी करुन घेणे. आश्वासक आणि सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांच्या सहभाग व समर्थन मिळविणे.
    • भेदभावरहित धोरणे: दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत कोणत्याही प्रकारची गुंडगिरी, छळ अथवा बहिष्‍कृत करण्याची घटना टाळण्यासाठी भेदभावरहित धोरणांची अंमलबजावणी करणे.
    • वकिली आणि धोरण समर्थन: दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा आणि जिल्हा स्तरावरील सर्वसमावेशक शैक्षणिक धोरणांच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यांच्या हक्कांना प्रोत्साहन देणाऱ्या कायदयास समर्थन देणे.