बंद

    महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई

    सामाजिक न्याय विभागाच्या शासन निर्णय क्र. ईडीडी-२००१/सी.आर.६५/सुधार-३ता.२१.११.२००१ द्वारा महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मुंबई स्थापण्यात आलेले आहे. हे महामंडळ, दि. २७ मार्च २००२ रोजी कंपनी अधिनियम १९५६ च्या कलम २५ खाली नोंदणीकृत करण्यात आले आहे.

    राज्यातील 18 ते 60 वयोगटातल दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरुपात अर्थसहाय्य करण्याचे कार्य या महामंडळाकडे सोपविले आहे. सदरहू योजनेचा उद्देश मुख्यत्वेकरुन कमी भांडवलात व्यवसाय सुरु करणे शक्य व्हावे हा आहे. राष्ट्रीय महामंडळाची दिव्यांग स्वावलंबन योजना व राज्य शासनाची वैयक्तीक थेट कर्ज योजना या महामंडळामार्फत राबविल्या जातात. राष्ट्रीय दिव्यांगजन वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांची प्राधिकृत वाहीनी आहे.

    ह्या महामंडळाची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत:-

    • दिव्यांग व्यक्तींच्या फायद्यासाठी आणि आर्थिक पुनर्वसनासाठी, त्यांच्या धर्म, लिंग, जात आणि वयाकडे दुर्लक्ष करून, आर्थिक विकास उपक्रम, ज्यामध्ये स्वयंरोजगार आणि इतर व्यवसायांचा समावेश आहे, चालू करणे, चालू ठेवणे, चालू ठेवण्यास मदत करणे आणि अशा उपक्रमांना प्रोत्साहन देणे. असे उपक्रम राज्य शासनाच्या मंत्रालय / विभागाच्या सहकार्याने राबवणे.
    • दिव्यांग व्यक्तींना आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य योजना / प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याकरता आर्थिक मदत / कर्ज / सवलतीच्या दरात वित्तसहाय्य उपलब्ध करून देणे,
    • दिव्यांग व्यक्तींना पदवी आणि उच्च स्तरावर शिक्षण घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करून देणे
    • तांत्रिक आणि उद्योजकीय कौशल्यांमध्ये श्रेणीवाढ आणि सुधारणा करण्यासाठी मदत करणे,
    • दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक पुनर्वसन आणि उन्नतीचे लक्ष्य ठेऊन, प्रशिक्षण, गुणवत्ता नियंत्रण, प्रक्रिया विकास आणि पायाभूत विकास कार्यक्रमांची स्थापना करणे.
    • दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी कार्यरत असणाऱ्या इतर संस्थांना आर्थिक मदत देऊन सहायता करणे,
    • दिव्यांग व्यक्तीं चालवत असलेल्या त्यांच्या व्यवसायात, त्यांना, कच्चा माल खरेदी करणे आणि तयार मालाचे विपणन करणे अशा कामात सहाय्य करणे आणि राज्य वित्त महामंडळ किंवा केंद्रशासनाकडून मिळणाऱ्या निधीचे वितरण करणारी सर्वोच्च संस्था म्हणून काम करणे.

    महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळातर्फे खालील तीन योजना राबविल्या जातात:

    1. मुदत कर्ज (लहान आणि मध्यम व्यवसाय)
    2. शिक्षण कर्ज
    3. अल्पपतपूरवठा

    याबद्दल अधिक तपशील त्यांच्या वेबसाइटवर आढळू शकतात. पुनर्निर्देशित करण्यासाठी इथे क्लिक करा.

    • पत्ता : ---