व्यक्तींसाठी
दिव्यांग व्यक्तींच्या क्षमतेचा पुरेपूर उपयोग करणे आणि त्यांना समाजात, मुख्य प्रवाहात सामावून घेणे असा आमचा मुख्य उद्देश असला तरी, तुमच्या मदतीशिवाय तो अपूर्ण राहील. तुमचा थोडासा वेळ आणि प्रयत्न, या उद्दिष्टापर्यन्त पोहोचण्यासाठी मदत करतील.
समानुभूतीच्या पातळीवर बघता, दिव्यांग व्यक्तींना खालीलप्रकारे मदत करता येऊ शकते:
-
- ऐका आणि शिका : दिव्यांग व्यक्तींचे अनुभव आणि आव्हानांना ऐकण्यासाठी वेळ द्या. अपंगत्वाचे वेगवेगळे प्रकार, त्यांचा प्रभाव यांच्याबद्दल शिकून घ्या. तुम्ही त्यांना कशाप्रकारे समर्थन देऊ शकता, जाणून घ्या.
- आदर करा आणि प्रतिष्ठा द्या : दिव्यांग व्यक्तींना आदराने आणि प्रतिष्ठेने वागवा. गोष्टी गृहीत धरू नाक आणि अपमानास्पद भाषा टाळा. त्यांच्या क्षमतेवर आणि कर्तबगारीवर लक्ष केंद्रित करा, अपंगत्वावर नको.
- मदत करताना विचारपूर्वक करा : तुम्ही त्यांना कशाप्रकारे मदत करु शकता हे विचारा, त्यांना काय हवे आहे गृहीत धरू नका. त्यांच्या कृती-स्वातंत्र्याचा आदर करा आणि त्यांना काय मदत हवी आहे ते त्यांनाच ठरवू द्या.
- सहनशील आणि समजूतदार बना : दिव्यांग व्यक्तींना काही कामे करायला जास्त वेळ लागतो हे समजून घ्या. सहनशील आणि समजूतदार बना आणि त्यांना त्यांची कामे करायला आवश्यक तेवढा वेळ द्या.
- कीव करणं टाळा : दिव्यांग व्यक्तींची कीव करणं टाळा. त्यांच्या संघर्षाबद्दल समानुभूती बाळगा आणि लक्षात असू द्या ते स्वतःचे सामर्थ्य आणि क्षमता असलेल्या कर्तबगार व्यक्ती आहेत.
- सर्वसमावेशक उपक्रमांमध्ये सहभागी व्हा : जिथे शक्य असेल तिथे, दिव्यांग व्यक्तींना सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमात सामील करून घ्या. वेगवेगळ्या उणिवा पूर्ण करणाऱ्या सर्वसमावेशक जागा आणि कार्यक्रम शोधा.
- साथीदार बना : भेदभावाविरुद्ध आवाज उठवून आणि त्यांच्या हक्कांचे समर्थन करून, दिव्यांग व्यक्तींचे साथीदार व्हा.
- आत्मनिर्भरपणाला सशक्त बनवा : त्यांच्या आत्मनिर्भरपणाला आणि स्वसमर्थनाला पाठिंबा द्या. विविध परिस्थितीमधील त्यांच्या गरजा आणि प्राधान्ये यांच्याबद्दल बोलण्यास त्यांना प्रोत्साहन द्या.
- यश साजरे करा: दिव्यांग व्यक्तींच्या कर्तूत्वाचे कौतुक करा नि त्यांचे यश साजरे करा. त्यांची अडचणींवर मात करण्याची जिद्द आणि त्यांच्या समाजातील योगदानाची दखल घ्या.
- मनमोकळा संवाद साधा : दिव्यांग व्यक्तींशी मनमोकळा संवाद साधा आणि त्यांच्याशी दृढ संबंध प्रस्थापित करा. विचारांच्या मोकळ्या देवाणघेवाणीमधे सामील व्हा आणि विश्वास आणि समजूतदारपणाचे वातावरण निर्माण करायला उत्तेजन द्या.
- त्यांची भाषा शिकून संवाद साधण्याचा प्रयत्न करा : उदाहरणार्थ, प्राथमिक खुणांची भाषा शिकून तुम्ही कर्णबाधित आणि बोलण्यात विकलांगता असणाऱ्या व्यक्तींशी जास्त चांगल्या तऱ्हेने संवाद साधू शकता.
आम्ही आणखी काही मार्ग नमूद केले आहेत ज्यायोगे तुम्ही आम्हाला मदत करु शकता. जर यांच्याकडून एखादा पर्याय राहून गेला असेल तर तुमच्या कल्पना आम्हाला इथे us2[dot]dkv[at]maharashtra[dot]gov[dot]in कळवा.
- आपला आवाज उंचवा. समर्थक बना ! अपंगतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आम्हाला मदत करा, आमच्या सामाजिक संपर्कजाळ्यामद्धे सामील व्हा आणि हा संदेश इतरांपर्यंत पोचवण्यासाठी मदत करा.
- परिवर्तनाचा घटक बना. दान करा.
- आमच्या आणि आमच्या साथीदारांच्या केंद्रांमध्ये प्रशिक्षणार्थी आणि स्वयंसेवकांचे आम्ही स्वागत करतो.