बंद

    दिव्यांग व्यक्तीला अपंगत्व ओळखपत्र

    वैश्विक दिव्यांग ओळखपत्र

    दिव्यांग व्यक्तींसाठी राष्ट्रीय माहिती तयार करणे आणि प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला वैश्विकदिव्यांगत्व ओळखपत्र देणे या उद्देशाने “दिव्यांग व्यक्तींसाठी वैश्विकदिव्यांगत्व ओळखपत्र” प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात. हा प्रकल्प केवळ पारदर्शकता, कार्यक्षमता आणि दिव्यांग व्यक्तींना सरकारी लाभ देण्याच्या सुलभतेचीच खात्री देत नाहीतरएकसमानतेचीही खात्री देतो. गावस्तर, ब्लॉक स्तर, जिल्हास्तर, राज्यस्तर आणि राष्ट्रीय स्तरावरील अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर लाभार्थीच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचे निरीक्षण सुव्यवस्थित करण्यात देखील प्रकल्प मदत करेल.

    उद्दिष्ट

    या प्रकल्पाचे उद्दिष्ट, दिव्यांग व्यक्तींना नवीन वैश्विक दिव्यांग ओळखपत्र/ दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सक्षम करणे. जेणेकरुन सरकारद्वारे विविध मंत्रालये आणि त्यांच्या विभागांद्वारे प्रदान केलेल्या योजना आणि लाभांचा लाभ घेता येईल. हे ओळखपत्र संपूर्ण भारतात वैध असेल. वैश्विक दिव्यांग ओळखपत्रसंस्थळाची रचनाखालील गोष्टीदुरदृष्यप्रणालीद्वारे करण्यासाठी सुलभ होतील अशा दृष्टीने केली जाईल :

    1. वैश्विक दिव्यांग ओळखपत्रासाठी नवीन अर्ज
    2. वैधता संपल्यावर विद्यमान प्रमाणपत्र/ओळखपत्राचे नूतनीकरण
    3. ओळखपत्र /प्रमाणपत्र हरवल्यास

    ओळखपत्राचे लाभ

    वैश्विक दिव्यांग ओळखपत्रअपंग व्यक्तींना अनेक लाभ मिळवून देईल जे खालीलप्रमाणेआहेत:

    • दिव्यांग व्यक्तींना कागदपत्रांच्या एकापेक्षा जास्त प्रती बनवण्याची, देखरेख करण्याची आणि अनेक कागदपत्रे बाळगण्याची गरज नाही कारण ओळखपत्रात सर्व आवश्यक तपशील आधीच नोंदवून ठेवलेले असतील जे वाचनयंत्राद्वारे उलगडले जाऊ शकतात.
    • वैश्विक दिव्यांग ओळखपत्र हे भविष्यात विविध फायद्यांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींची ओळख, पडताळणीचा एकमेव दस्तऐवज असेल.
    • वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, अंमलबजावणीच्या सर्व स्तरांवर जसे की गाव, गट,जिल्हा, राज्यआणि राष्ट्रीय स्तर,लाभार्थ्यांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा मागोवा घेण्यास मदत करेल.

    तुम्ही वैश्विक दिव्यांग ओळखपत्रासाठी इथे अर्ज भरू शकता.
    वैश्विक दिव्यांग ओळखपत्र उपक्रमाबद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल. इथे

    २१ऑगस्ट२०२३ ची आकडेवारी
    प्रकार संख्या
    २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या २९,६३,३९२
    प्राप्त झालेल्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्र अर्जाची एकूण संख्या १५,०३,५३२
    व्युत्पन्न केलेल्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्रांची एकूण संख्या ९,८२,५०७
    नाकारल्या गेलेल्या वैश्विक दिव्यांग ओळखपत्रांची एकूण संख्या २,७२,८३५
    प्रलंबित वैश्विक दिव्यांग ओळखपत्रांची एकूण संख्या २,४८,१९०

    भेट : https://www.swavlambancard.gov.in