बंद

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती

    • तारीख : 11/01/2024 -

    दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षण शिष्यवृत्ती

    निधी

    केंद्र शासनाकडून

    पात्रता निकष

    सर्वसाधारण पात्रता निकष –

      • शिष्यवृत्ती फक्त भारतीय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत.
      • शिष्यवृत्तीचे सर्व घटक अशा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील, जे योजनेचे प्रमुख निकष जसे की, ४०% किंवा जास्त अपंगत्व (अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अनुसार), पूर्ण करत असतील आणि ज्यांच्याकडे, सक्षम प्राधिकार्याने, नियमानुसार, निर्गमित केलेले ग्राह्य अपंगत्व प्रमाणपत्र असेल.
      • समान पालकांच्या दोन पेक्षा जास्ती दिव्यांग मुलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. दुसरे मूल जर जुळे असेल तर ही शिष्यवृत्ती योजना त्या जुळ्या मुलाला/मुलीला लागू होईल.
      • ही शिष्यवृत्ती कुठल्याही एका इयत्तेत शिक्षण घेण्यासाठी एकाच वर्षासाठी दिली जाईल. एखादा विद्यार्थी एकाच इयत्तेत परत शिकणार असेल तर अशा दुसऱ्या किंवा नंतरच्या वर्षासाठी, त्याला/तिला, शिष्यवृत्ती मिळणार नाही.
      • या योजनेमधील शिष्यवृत्तीधारक आणखी कुठल्याही शिष्यवृत्ती / विद्यावेतनाचा लाभ घेऊ शकणार नाही. अशा विद्यार्थ्यांना, दुसरी शिष्यवृत्ती/विद्यावेतन स्वीकारण्याच्या दिवसापासून, या योजनेखालील कुठलीही शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.
      • (अर्जकर्त्याकडे) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी, दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्र / दिव्यांग व्यक्तींसाठी विशिष्ठ ओळखपत्रासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

    योजनेसाठी विशिष्ट पात्रता निकष –

      • (ही शिष्यवृत्ती) दिव्यांगजन सशक्तिकरण विभागातर्फे निर्गमित केलेल्या, शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ठ संस्थांमधील, स्नातक आणि पदव्युत्तर पदवी / पदविका अभ्यासक्रमांसाठीच ग्राह्य असेल.
      • या योजनेअंतर्गत, कुठल्याही शाखेचे दूरस्थ शिक्षण / अर्ध-वेळ / सप्ताहान्त शिक्षण, शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणार नाही. याशिवाय, एका व्यक्तीस एकदाच ही सुविधा मिळत असल्यामुळे, या घटकांतर्गत दिला जाणारा लाभ, दुसऱ्या अथवा नंतरच्या लाभासाठी विचारात घेतला जाणार नाही.
      • पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा अधिक नसावे.

    दिले जाणारे लाभ

    प्रमाणरूप अपंगत्व असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या उच्च श्रेणी शिक्षण शिष्यवृत्तीच्या प्रमाणामध्ये घटकांचा समावेश आहे.

    योजनेचा प्रकार

    शिष्यवृत्ती

    योजने अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया

    ह्या बद्दल जास्त माहिती त्यांच्या संकेतस्थळावर मिळू शकेल.पूनर्निर्देशित होण्यासाठी इथे कळ दाबा आणि योजनेसाठी अर्ज करा.

    योजनेची मार्गदर्शक तत्त्वे

    ह्या बद्दल जास्त माहितीसाठी येथे क्लिक करा.

    लाभार्थी:

    गट अ, ब आणि क मधील पदांसाठी भरती परीक्षा आणि विविध तांत्रिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आवश्यक प्रवेश परीक्षांसाठी ग्राह्य.

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे