बंद

    दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती

    • तारीख : 10/01/2024 -

    दिव्यांग व्यक्तींसाठी राज्य शालांत परीक्षा-पूर्व शिष्यवृत्ती

    निधी

    राज्य शासन

    योजनेचे उद्दिष्ट

    दिव्यांग मुलांच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे.

    प्रवर्ग

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    पात्रता निकष

    1. अर्जदार किमान ४०% दिव्यांग असावा
    2. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा
    3. इयत्ता पहिलीपासून ते दहावी पर्यन्त शिकत असले पाहिजे आणि शिक्षणाच्या मागील वर्षात अनुत्तीर्ण राहिलेले नसावा
    4. उत्पन्नाची मर्यादा नाही

    मिळणारे लाभ

    1. इयत्ता पहिली ते चौथी (कर्णबधीर असणाऱ्यांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी)
    2. प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१००/-

    3. इयत्ता पाचवी ते सातवी
    4. प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१५०/-

    5. इयत्ता आठवी ते दहावी
    6. प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.२००/-

    7. १८ वर्षे वयापर्यन्तच्या, मानसिक दुर्बलता आणि मानसिक आजाराने ग्रासलेल्या व्यक्ती
    8. प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.१५०/-

    9. कार्यशाळेतील दिव्यांग प्रशिक्षणार्थी
    10. प्रत्येक विद्यार्थ्याकरता दरमहा रु.३००/-

    अर्ज करण्याची प्रक्रिया

    अर्जदाराने विहित नमून्यामध्ये अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासहित संबंधित शाळेमार्फत अर्ज दाखल करावा.

    योजनेचा प्रकार

    शिक्षण

    संपर्क कार्यालय

    जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर

    लाभार्थी:

    दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वर नमूद केल्याप्रमाणे