दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य
दिव्यांग व्यक्तींसाठी साधने आणि उपकरणांसाठी आर्थिक सहाय्य
निधी
राज्य शासन
योजनेचे उद्दिष्ट
दिव्यांग व्यक्तींना, त्यांचा वयोगट आणि दिव्यांगत्वाप्रमाणे, साधने आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी सहाय्य
प्रवर्ग
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
पात्रता निकष
- अर्जदार किमान ४०% दिव्यांगत्व असले पाहिजे
- अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
- अर्जदाराचे मासिक उत्पन्न खालीलप्रमाणे असल्यास –
अ. रु.१५००/- पेक्षा कमी : साधने आणि उपकरणांच्या किमतीच्या १००%
ब. रु.१५००/-ते २०००/- : साधने आणि उपकरणांच्या किमतीच्या ५०%
मिळणारे लाभ
अ. रु.१५००/- पेक्षा कमी : साधने आणि उपकरणांच्या किमतीच्या १००%
ब. रु.१५००/-ते २०००/- : साधने आणि उपकरणांच्या किमतीच्या ५०%
कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्र, अस्थिव्यं व्यक्तींसाठी कुबड्या, तिचाकी, कॅलिपर्स , चाकाची खुर्ची, अंध व्यक्तींसाठी शैक्षणिक वापराकर्ता फीत ध्वनिमुद्रकआणि कोरी ध्वनीफीत (रु. ३०००/- पर्यन्त).
अर्ज करण्याची प्रक्रिया
अर्जदाराने विहित नमून्यातील अर्ज भरुन संबंधित जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद /सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्याकडे दाखल करणे. विहित नमुन्यामध्ये, आवश्यक कागदपत्रासहित, अर्ज दाखल करावा.
योजनेचा प्रकार
विशेष सहाय्य
संपर्क कार्यालय
जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परि/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, मुंबई शहर व उपनगर
लाभार्थी:
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ प्रमाणे, २१ अपंगत्व प्रवर्गामधील दिव्यांग व्यक्ती
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे