बंद

    भांडार

    अपंग प्रतिभावान कारागीर, आपल्या अविश्वसनीय जिद्द, सर्जनशीलता आणि कौशल्य अशा गुणांमुळे, अडथळे पार करून, शक्यतांची परिभाषाच बदलून टाकतात. त्यांची विलक्षण कारागिरी , त्यांच्या जिद्दीची ताकद आणि मानवी भावनांच्या अमर्याद सामर्थ्याची साक्ष देते. विविध शारीरिक आणि आकलनविषयक आव्हानांना तोंड देत, ह्या व्यक्ती, त्यांच्या कलेत प्राविण्य मिळवून, अत्यंत सुंदर आणि नाजुक नक्षीकाम असलेल्या वस्तू निर्माण करतात. त्यांची क्षमता त्यांची कलात्मक प्रतिभा दाखवून देते आणि कला क्षेत्रामधे सर्वसमावेशकता आणि विविधतेची प्रेरणा देते. अशा सक्षम कारागिरांचे यश साजरे करून आणि त्यांना सहाय्य करून आपण एका अशा समाजाला प्रोत्साहन देऊ शकतो, जिथे, प्रत्येक व्यक्तीची, अपंग किंवा सुदृढ, किंमत केली जाईल आणि आगळयावेगळ्या क्षमतांना आणि योगदानांना महत्व दिले जाईल.

    दिव्यांग कल्याण विभागातर्फे, तुमच्यासाठी, दिव्यांग व्यक्तींनी बनवलेल्या अर्थपूर्ण भेटवस्तू उपलब्ध केल्या गेल्या आहेत. ही एक अशी ध्येयपूर्ण जागा आहे जिथे कारागिरांनी बनवलेल्या भेटवस्तूंचे दुवे तुम्हाला मिळतील. आम्ही लहान आणि मोठ्या नामांकित संस्था/संघटनांना भागीदार बनवून जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना प्रोत्साहित करतो.