बंद

    उद्दिष्टे आणि कार्ये

    उद्दिष्टे

    ह्या विभागाची प्राथमिक उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत :-

    1. दिव्यांग व्यक्तींच्या अंगभूत प्रतिष्ठेचा आदर, वैयक्तिक स्वायक्तेसह स्वातंत्र आणि स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणे. तसेच आत्मनिर्भर होण्यास मदत करणे.
    2. भेदभाव न करणे.
    3. समाजातील सर्व पैलूंमध्ये पूर्णपणे दिव्यांग व्यक्तींचा सहभाग आणि समावेश होण्यासाठी प्रयत्न करणे.
    4. दिव्यांग व्यक्तींच्या विविधतेची स्वीकृती करणे. दिव्यांग व्यक्तींचीभिन्नता आणि स्वीकृती आणि मानवतेचा आदर करणे.
    5. दिव्यांग व्यक्तींसाठी संधीची समानता उपलब्ध करुन देणे.
    6. अडथळामुक्त आणि सुगम्य वातावरण निर्माण करणे.

    मूल्ये

    1. सहयोग
      एकसमान ध्येयासाठी संयुक्तपणे काम केल्याने केवळ खूप मोठा प्रभाव निर्माण होते. तसेच त्या सहभागी होत असलेल्या सर्वांच्या मुल्यांचे संवर्धन होते असा आमाचा विश्वास आहे.
    2. समर्पण वृत्ती
      विभागाकडून केलेल जाणारे कार्य आणि घेण्यात आलेले निर्णय आमच्या ध्येयाशी निगडीत करुन आम्ही आपल ध्येयाशी वचनबध्द आहोत.
    3. सर्वसमावेशक
      वातावरण निर्मिती, सहानुभूती, सुगमता अशा गुणांचा पुरस्कार करून आणि आमच्या कार्यामध्ये या सर्वाचा समावेश असलेला समाज निर्माण करण्याचे आमचे ध्येय आहे.
    4. प्रेरणा
      दिव्यांग व्यक्तींच्या मनात आशावादाचीभावना निर्माण करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही समर्पित आहोत.
    5. पारदर्शकता
      आम्ही विविध विचार आणि मतांचे स्वागत करतो. तसेच आम्ही देत असलेल्या सेवा लोकांच्या फायद्यासाठी आहेत. माहितीची देवाण- घेवाण करण्यासाठी सन्मानपूर्वक संवेदनशील आहोत.
    6. विश्वासाहर्ता
      राज्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींसाठीआम्हीआमची कर्तव्ये उत्कृष्ट व सचोटीने पार पाडतो.

    कार्ये

    1. राज्यात अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि विविध धोरणे तसेच दिव्यांगांशी संबंधीत अन्य अधिनियमांची अंमलबजावणी करणे.
    2. राज्यात दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
    3. राज्यात अनुदाने, शिष्यवृत्ती, प्रोत्साहानात्मक अनुदाने यांचे ‍ वितरण व अंमलबजावणीवर नियंत्रण करणे.
    4. राज्यात माहिती व आधुनिक तंत्रज्ञान साधनांचा वापर करुन ई-ऑफीस द्वारे कामकाज करणे.
    5. विभागाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती विविध माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवणे.
    6. विविध कार्यक्षेत्रातील वेळोवेळी नमूद केलेल्या प्रमुख कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे.
    7. दिव्यांग क्षेत्रामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी माहिती, शिक्षण आणि संवाद यांना प्रोत्साहन देण्यासाठी परिषदा, कार्यशाळा, दूरदृश्य प्रणाली परिसंवाद आणि प्रदर्शनांचे आयोजन करणे.