बंद

    परिचय

    मा.मंत्रीमंडळाच्या दि.२९.११.२०२२ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाच्या दि.१५.१२.२०२२ च्या अधिसूचनेन्वये दिव्यांग कल्याण हा नवीन मंत्रालयीन प्रशासकीय विभाग स्थापन करण्यात आला आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रामध्ये २९,६३,३९२ दिव्यांग व्यक्ती असून त्यांची संख्या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या २.६३% आहे आणि ह्यामध्ये खालील ७ विकलांगतांचा समावेश होतो.

    क्र. तपशील पुरुष महिला एकूण
    महाराष्ट्रातील दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या १६,९२,२८५ १२,७१,१०७ २९,६३,३९२
    अंध ३,११,८३५ २,६२,२१७ ५,७४,०५२
    कर्णबधीर २,६४,९५६ २,०८,३१५ ४,७३,२७१
    मुकबधीर २,६०,७९२ २,१२,८१८ ४,७३,६१०
    अस्थिव्यंग ३,५७,३४८ १,९१,०७० ५,४८,४१८
    मानसिक दुर्बल ९०,४०८ ६९,८०१ १,६०,२०९
    मानसिक आजार ३२,९०७ २५,८४६ ५८,७५३
    इतर २,७९,०४८ २,३१,६८८ ५,१०,७३६
    बहुविकलांग ९४,९९१ ६९,३५२ १,६४,३४३

    शारिरीक, बौद्धिक संवेदनाक्षम आणि विकासात्मक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या /उपक्रमांच्या माध्यमातून विभागाकडून सहाय्य केले जाते .

    अपंग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६नुसार दिव्यांगत्वाचे २१ प्रवर्गात वर्गीकरण करण्यात आले आहे. उदा.कर्णबधीर, मुकबधीर, अस्थिव्यंग, मानसिक दुर्बल, मतीमंद, मानसिकदृष्टया आजारी व बहुविकलांग, इत्यादी.

    विभागाकडून दिव्यांग व्यक्तींना विशिष्ठ सेवासुविधा पुरविल्या जातात. या सुविधांमध्ये वैश्विक दिव्यांग ओळखपत्र, पुनर्वसन, शिक्षणाला प्रोत्साहन देणे, रोजगार निर्मिती करुन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करुन देणे, इत्यादी बाबींचा समावेश आहे.