बंद

    प्रेसनोट

    प्रकाशित तारीख: मार्च 17, 2025

    प्रेसनोट

    दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे अधिनस्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाद्वारे संचलित जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र, माहिम यांचे मार्फत मुंबई शहर जिल्हातील दिव्यांग व्यक्तींना सहाय्यक साधनांचे विनामुल्य वाटप करण्या साठी भारतीय अंध, अपंग पुनवर्सन संस्था, दादर मुंबई यांचे सहयोगाने रविवार दि.२३.०३.२०२५ रोजी सकाळी ९ ते सायं. ५ या वेळेत दत्ता राऊळ गणेशोत्सव मंडळ, आगर बाजार, एस. के. बोले रोड, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे आयोजित करण्यात आलेले शिबीर काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आले आहे.
    त्या एवजी सदरहू शिबीर जिल्हा दिव्यांग पुनवर्सन केंद्र, तळ मजला, साई ईश्वटी कॉ. हाउ. सो., मोगल लेन, एमटीएनएल कॉलोनी जवळ, माहीम (पश्चिम), मुंबई – ४०००१६ (माटुंगा वेस्टर्न रेल्वे स्थानका जवळ) दूरध्वनी : ८६५५४३६१३९ येथे दि.२३ ते २६ मार्च, २०२५ या कालावधीत सकाळी ११.०० ते सायं ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.

    शिबिराचा उद्देश:
    1. दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असे कृत्रिम पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, कुबड्या, वॉकर, एल्बो क्रचीस, व्हीलचेअर, चालण्याची काठी इ. सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी व मोजमाप घेण्यात येईल.
    2. दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयी- सुविधा उपलब्ध करुन रोजगार निर्मितीस चालना देणे.
    3. महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचे लाभ देऊन दिव्यांग व्यक्तींचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे.
    4. सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवार/कुटुंबासमवेत जीवन जगण्यास सक्षम करणे.

    तरी सदर शिबिराचा लाभ अधिकाधिक दिव्यांग व्यक्तींनी घ्यावा.